Join us

विजेवर धावणाऱ्या गाडीला चार्ज करण्यासाठी तासाला मोजावे लागणार २५ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 12:58 IST

Electric Vehicle : आजघडीला मुंबईत विजेवर धावणाऱ्या या गाड्यांची संख्या पाचशेहून अधिक असून, यात उत्तरोत्तर आणखी वाढ होणार आहे.

मुंबई - जसे जसे विजेवर धावणाऱ्या गाडयांची डिमांड वाढत आहे, तस तसे इलेक्ट्रिक व्हीकल कंपन्या कंबर कसून चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ करण्यावर भर देत आहेत. आजघडीला मुंबईत विजेवर धावणाऱ्या या गाड्यांची संख्या पाचशेहून अधिक असून, यात उत्तरोत्तर आणखी वाढ होणार आहे. आणि विजेवर धावणाऱ्या या एका गाडीला चार्ज करण्यासाठी दोन ते तीस द्यावे लागणार असून, एका तासासाठी पंचवीस रुपये अधिक जीएसटी मोजावा लागणार आहे.

देशात आज घडीला १० हजाराहून अधिक महाराष्ट्रमध्ये २ हजार आणि मुंबईमध्ये ५०० विजेवरील गाड्या धावत आहेत. येणा-या काही वर्षांमध्ये जेम तेम ४० टक्के मार्केट विजेवर धावणाऱ्या वाहनांनी व्यापले जाईल. एक वाहन चार्ज होण्यासाठी २ ते ३ तास लागतात. १ तास साठी २५ रुपये मोजावे लागतात. यात पाच टक्के जीएसटी आहे. एक वाहन चार्ज केले तर ६० ते ४८० किलो मीटर धावू शकते. 

 

या क्षेत्रातील तज्ज्ञ परिवेश शुक्ला यांनी सांगितले, चार्जिंग स्टेशनचा बिझनेस भारतामध्ये यशस्वी ठरू शकला नाही; कारण एक तर चार्जिंग स्टेशनचे दर खूप महाग होते. आणि त्याचे चार्जिंग स्टेशन सोबत जोडलेले रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मात्र आता परिस्थिती सुधारत असून, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासह सरकारी धोरणाला अपेक्षित सहकार्य म्हणून विजेवर धावणा-या गाड्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. तर दुसरीकडे हे चार्जिंग स्टेशन २४ तास उपलब्ध असणार असून, ते मानवरहित काम करणारे आहेत. 

टॅग्स :वीजेवर चालणारं वाहनइलेक्ट्रिक कारमुंबई