Join us

आपणच माझी प्रेरणा.... अमृता फडणवीसांकडून पती देवेंद्र यांना वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 17:08 IST

लॉकडाऊन आणि कोरोना महामारीच्या संकटामुळे सध्या ऑनलाईन शुभेच्छा देत त्यांच्या दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

ठळक मुद्देअमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पती देवेंद्र यांच्यासमवेतचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. 

मुंबई - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही दिग्गज नेत्यांचा आज वाढदिवस आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन खास फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळाही दिला आहे. देवेंद्र यांना आता घरातूनही शुभेच्छा मिळाल्या आहेत. पत्नी अमृता यांनी पती देवेंद्र यांच्याबद्दल चार शब्द लिहून त्यांना प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत.  

देवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना राज्यातील दिग्गज नेत्यांकडून, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. लॉकडाऊन आणि कोरोना महामारीच्या संकटामुळे सध्या ऑनलाईन शुभेच्छा देत त्यांच्या दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, मात्र कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या शुभेच्छाही तितक्याचं जिव्हाळ्याच्या असतात. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पती देवेंद्र यांच्यासमवेतचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. 

लोकमाणूस, सातत्याने लोकांसाठी निस्वार्थीपणे सेवा देणाऱ्या, त्यांच्या सार्वजनिक जीवनात प्रत्येक दिवशी अतोनात मेहनत घेणाऱ्या, समाजाच्या कल्याणासाठी स्वत:ला वाहून घेणाऱ्या, देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा ! आपणच माझी आणि अनेकांची प्रेरणा आहात. मानवसेवा करताना शांती शोधणाऱ्या सर्वांसाठी आपलं व्यक्तीमत्व प्रेरणादायी आहे, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीसट्विटर