योग दिवस महत्त्वाचा, योगमुळे आत्मबळ वाढते- केंद्रीय मंत्री पियुष गोयल
By मनोहर कुंभेजकर | Updated: June 21, 2023 12:46 IST2023-06-21T12:42:34+5:302023-06-21T12:46:21+5:30
आमदार ॲड. आशिष शेलार यांचीही उपस्थिती

योग दिवस महत्त्वाचा, योगमुळे आत्मबळ वाढते- केंद्रीय मंत्री पियुष गोयल
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारताच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून आपल्या देशातून सुरू झालेला योग दिन जगभर साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अमेरिकेत योगा दिन साजरा होत आहे. योगामध्ये विलक्षण ताकद असून आपले आत्मबळ वाढविण्याचे काम योगामुळे होते, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोउद्योग मत्री पियुष गोयल यांनी आज येथे केले.
मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थिती वांद्रे पश्चिम येथील योगा गार्डन येथे आज सकाळी आंतराष्ट्रीय योग दिन निमित्ताने योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह आमदार ॲड. आशिष शेलार, इस्त्रायलचे कौन्सील जनरल कोब्बी शोशनी आणि त्यांची पत्नी तसेच पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, निवृत्त व्हाईस ॲडमिरल कर्वे, माजी आमदार कृपाशंकर सिंह, किरिट भन्साळी आदींसह माजी नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मुंबई पोलीस दलातील कर्मचा-यांसह मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी व स्थानिक नागरीक यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत योगा केला.