यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने सुरक्षित; १२६ ठिकाणी लागली आग मात्र मोठी दुर्घटना नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 00:30 IST2019-10-31T00:29:45+5:302019-10-31T00:30:56+5:30
या वर्षी २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान दिवाळी साजरी करण्यात आली.

यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने सुरक्षित; १२६ ठिकाणी लागली आग मात्र मोठी दुर्घटना नाही
मुंबई : दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे आग लागण्याचे प्रमाण या पाच दिवसांमध्ये वाढल्याचे दिसून येते. मात्र, यावेळेस मुंबईकरांनी दिवाळी खरोखर सुरक्षितपणे साजरी केली आहे. या काळात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत १२६ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. यातील ४७ ठिकाणी फटाक्यांमुळे आगीचा भडका उडाला. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या वर्षी २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळेस ध्वनिप्रदूषणात घट झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे, १२६ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. मात्र, यापैकी काही किरकोळ स्वरूपाच्या होत्या. सुदैवाने कोणती मोठी दुर्घटना घडली नाही, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी सांगितले.
या १२६ कॉलपैकी १२५ कॉलमध्ये एक क्रमांकाची आग होती. रे रोड येथे एका व्यापारी गाळ्याला लागलेली आग ही या आगीपैकी सर्वात मोठी आग होती.