भूमिपूजन होऊन वर्ष झाले; बांधकामाला मुहूर्त मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 03:05 AM2019-02-20T03:05:27+5:302019-02-20T03:05:49+5:30

हँकॉक पुलाची व्यथा : झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात पालिका अपयशी

Years ago, Bhumi Pujan; Do not get acquainted with the construction work! | भूमिपूजन होऊन वर्ष झाले; बांधकामाला मुहूर्त मिळेना!

भूमिपूजन होऊन वर्ष झाले; बांधकामाला मुहूर्त मिळेना!

Next

मुंबई : भूमिपूजनाचा कार्यक्रम वर्षभरापूर्वी उरकल्यानंतरही अद्याप दक्षिण मुंबईतील हँकॉक पुलाच्या कामाचा आरंभ झालेला नाही. काही बांधकामे या पुलाच्या कामात अथडळा ठरत असल्याने, तीन वर्षांच्या विलंबानंतरही हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला मुहूर्त मिळालेला नाही. याचा नाहक त्रास मात्र स्थानिकांना सहन करावा लागत आहे.

मध्य रेल्वेवरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन हँकॉक पूल धोकादायक बनला होता. त्यामुळे जानेवारी २०१६ मध्ये रेल्वे आणि महापालिकेने हा पूल पाडला. त्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. अनेक अडथळे पार करीत, या पुलाच्या कामाला गेल्या वर्षी हिरवा कंदील मिळाला. त्यानुसार, भूमिपूजनाचा कार्यक्रमही वाजतगाजत पार पडला.
मात्र, गेल्या वर्षभरात पुलाची पायाभरणीदेखील ठेकेदाराला करता आलेली नाही, तर पुलाजवळील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात महापालिका प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. याचा फटका या कामाला बसला आहे.
या मार्गाने स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या कामाचा आढावा घेऊन त्याला वेग देण्यासाठी तातडीची बैठक बोलाविण्यात
आली आहे.

५१ कोटींचा खर्च अपेक्षित
च्रेल्वे रूळ ओलांडताना अपघातांचे प्रमाण वाढल्याने हा पूल लवकर बांधावा, अशी मागणी होत होती. मात्र, पालिकेने निविदा काढून नेमलेले ठेकेदार रस्ते घोटाळ्यात दोषी असल्याचे समोर आले.
च्या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने हे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिल्याने पालिकेला फेरनिविदा काढाव्या लागल्या.

च्दरम्यान, जीएसटी लागू झाल्यामुळे पुन्हा फेरनिविदा काढण्याची वेळ आली. हँकॉक पूल तोडल्यामुळे माझगाव ताडवाडी परिसरातील नागरिकांना वळसा घालून जावे लागत होते.

च्पुलांच्या दुरुस्तीचे मोठे काम महापालिकेने या वर्षी हाती घेतले असून, यासाठी १०८ कोटी रुपयांची तरतूद सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात करण्यात आली आहे.
च्हँकॉक पुलाच्या दुरुस्तीवर ५१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Web Title: Years ago, Bhumi Pujan; Do not get acquainted with the construction work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई