विमानात मागविलेल्या सँडविचमध्ये अळी! अन्नसुरक्षा महामंडळाची इंडिगोला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 12:56 IST2024-01-06T12:55:23+5:302024-01-06T12:56:44+5:30

२९ डिसेंबर रोजी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या खुशबू गुप्ता या महिलेने प्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कॅटरिंग सेवेतून सँडविच मागवले होते.

Worms in the sandwich ordered on the plane Indigo Notice of Food Security Corporation | विमानात मागविलेल्या सँडविचमध्ये अळी! अन्नसुरक्षा महामंडळाची इंडिगोला नोटीस

विमानात मागविलेल्या सँडविचमध्ये अळी! अन्नसुरक्षा महामंडळाची इंडिगोला नोटीस

मुंबई : इंडिगो कंपनीच्या विमानाने दिल्ली ते मुंबई या प्रवासादरम्यान एका प्रवाशाला दिलेल्या खाद्यपदार्थात अळी निघाल्याच्या घटनेची फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात एफएसएसएआयने (भारतीय खाद्य संस्था व मानक प्राधिकरण) गंभीर दखल घेतली असून या संदर्भात कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

२९ डिसेंबर रोजी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या खुशबू गुप्ता या महिलेने प्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कॅटरिंग सेवेतून सँडविच मागवले होते. मात्र, त्या सँडविचमध्ये अळी आढळून आली होती. गुप्ता यांनी त्याचा सँडविचचा फोटो व व्हिडीओ काढत तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. त्यानंतर इंडिगो कंपनीने दिलगिरीदेखील व्यक्त केली होती. मात्र, या प्रकरणाची एफएसएसएआयने गंभीर दखल घेत तुमच्या खाद्यान्नाचा परवाना रद्द का करू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. तसेच, या प्रकरणी कंपनीला सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
 

Web Title: Worms in the sandwich ordered on the plane Indigo Notice of Food Security Corporation