मुंबई : सोन्याचे दागिने बनविण्याच्या बहाण्याने ४५ लाखांचे सोने घेऊन कामगाराने पळ काढला. ही घटना कुर्ला परिसरात घडली. याप्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण मटकर (५२) हे कुर्ल्यातील सुभाषनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मालकीच्या खोलीत भाड्याने राहणारा सोने कारागीर सुकेंदू रणजीत सामंता व त्याची पत्नी मधुमिता सामंता हे गेली १८-२० वर्षे ओळखीचे होते. त्यामुळे विश्वासाने मटकर यांनी १३ ऑगस्ट २०२५ रोजी आईचे जुने दागिने वितळवून तयार केलेली २०० ग्रॅम सोन्याची लगड, २० ग्रॅम सोन्याचा तुकडा, असे एकूण २२० ग्रॅम सोने नवीन दागिने बनविण्यासाठी दिले होते.
अनेकांच्या दागिन्यांचा अपहार केल्याचा संशयतक्रारदार मटकर यांनी पश्चिम बंगालमधील आरोपीच्या मूळ गावी जाऊन चौकशी केली असता, त्यांना केवळ ५९.५४० ग्रॅम सोन्याची लगडी परत देण्यात आली. मात्र, उर्वरित सुमारे १६०.४६ ग्रॅम सोने परत देण्यास नकार देण्यात आला. याशिवाय, इतर तक्रारदारांमध्ये शांतीलाल जैन (७० ग्रॅम), नरेश जैन (१०८.८३ ग्रॅम) आणि वैशाली सोनी (११८ ग्रॅम) यांचेही सोने आरोपीने अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकूण सुमारे ४५.७० लाख रुपयांच्या सोन्याचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
Web Summary : A Kurla worker stole gold worth ₹4.5 million from his employer, betraying a 20-year trust. The worker, entrusted with making jewelry, fled with the gold. Police have registered a case, revealing a larger scheme involving multiple victims and misappropriated gold.
Web Summary : कुर्ला में एक कर्मचारी ने 45 लाख रुपये का सोना चुरा लिया, 20 साल का विश्वासघात किया। आभूषण बनाने के लिए दिए गए सोने के साथ कर्मचारी फरार हो गया। पुलिस ने मामला दर्ज किया, जिसमें कई पीड़ितों और सोने के दुरुपयोग का खुलासा हुआ।