Devendra Fadnavis ( Marathi News ) : 'लोकसभेमध्ये वक्फ बोर्डाचे बील मांडण्यात आले आहे. मला याचा आनंद आहे, विधेयकावर चर्चा सुरू आहे. हे बील पास होईल याचा मला विश्वास आहे. आधीच्या कायद्यात न्यायालयात जाण्याची मुभा नव्हती, आता चुका सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. न्यायालयात जाता येणार आहे. तीन तलाकनंतर वक्फ बोर्डात महिलांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ बोर्डच्या विधेयकावर दिली.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आज संसदेत मांडण्यात आले आहे. यावरुन आता देशभरात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी या विधेयकाचा विरोध सुरु केला आहे. दरम्यान, आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीन तलाकनंतर वक्फ बोर्डात महिलांना संधी मिळत आहे. हे पुरोगामी पाऊल आहे. हे विधेयक कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, धार्मिक आस्थाच्या विरोधात नाही. तर पूर्वी झालेल्या चुकांमुळे काही लोक त्याचा फायदा घेत होते. मोठ्या प्रमाणांमध्ये जमिनी लाटत होते. त्यांच्यावर मात्र टाच येणार आहे, म्हणून मी या बीलाचे स्वागत आहे. ज्यांची ज्यांची विवेकबुद्धी जागृत आहे ते सगळे या बीलाचे समर्थन करतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधकांवर टीका
विरोधक या संदर्भात कोणताही पुरावा आणू शकले नाहीत. २५ राज्यांनी ज्या सुधारणा सांगितल्या त्या करण्यात आल्या आहेत. मला असं वाटतंय विरोधकांनी जर छातीवर हात ठेऊन जर निर्णय केला तर या बीलाच्या बाजूनेच निर्णय करतील. त्यांची लाचारी आहे, पाय चाटायचे आहेत म्हणून आता विरोधक या बीलाचा विरोध करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.