Women, girls talking on what topics; twitter report | महिला, मुली कशावर सर्वाधिक गॉसिप करतात? ट्विटरचे सर्वेक्षण जाहीर

महिला, मुली कशावर सर्वाधिक गॉसिप करतात? ट्विटरचे सर्वेक्षण जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : ट्विटरवर भारतीय महिला कोणत्या विषयावर जास्त चर्चा करतात याविषयी ट्विटर इंडियाने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात जानेवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत भारतातील १९ शहरांमधील ७ हजार ८३९ महिलांच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९९२ ट्विट्सचा अभ्यास करण्यात आला. यात भारतीय महिला फॅशन, पुस्तके, सौंदर्य, क्रीडा आणि मनोरंजन या विषयांवर सर्वाधिक चर्चा करत असल्याचे निदर्शनास आले. 


आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने हे सर्वेक्षण केले. त्यानुसार, भारतीय महिलांनी ट्विटरवर ट्रेंडिंग टॉपिक, चालू घडामोडी अशा विविध प्रकारच्या संभाषणांद्वारे स्वत:चे स्थान कोरले आहे. ट्विटरवर २४.९९ टक्के भारतीय महिलांनी आपल्याला असणारी आवड आणि रुची याबद्दल सर्वांत जास्त चर्चा केली. ज्यामध्ये फॅशन, पुस्तके, सौंदर्य, मनाेरंजन आणि अन्न यांचा समावेश आहे. तर २०.८ टक्के महिलांनी चालू घडामोडी, १४.५ टक्के महिलांनी सेलिब्रिटी क्षण, ११.७ टक्के महिलांनी समुदाय आणि ८.७ टक्के महिलांनी सामाजिक बदल या विषयांवर चर्चा केली. भारतातील विविध शहरांनुसार महिलांच्या चर्चेचे मुद्दे वेगवेगळे आहेत. चेन्नईतील महिलांनी सेलिब्रिटी क्षण, क्रिएटिव्ह शोकेस आणि दररोजच्या घडामोडी याबद्दल, तर बंगळुरूमधील महिलांनी समाजापुढील आव्हाने या विषयावर सर्वाधिक चर्चा केली. गोहाटीतील महिलांनी त्यांची आवड आणि चालू घडामोडी यावर जास्त चर्चा केली. 


याविषयी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांनी सांगितले की, ट्विटरचा वापर करणाऱ्या महिलांना जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. सर्वेक्षणातून असे दिसून येते की ट्विटर हे प्रत्येक स्त्रीसाठी आहे म्हणूनच तेथे त्या मुक्तपणे व्यक्त होतात. भारतातील विविध शहरांमधील सर्वेक्षणानुसार आवड आणि रुची या विषयावर गुवाहाटी, लखनऊ आणि पुणे येथील महिलांनी सर्वांत जास्त चर्चा केली. याचप्रमाणे चालू घडामोडींवर गुवाहाटी आणि दिल्ली येथील महिलांनी, सेलिब्रिटी क्षण याविषयी चेन्नई, कोलकाता, मदुराई येथील महिलांनी, सामुदायिक विषयावर बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद येथील महिलांनी, तर सामाजिक बदल या विषयावर बंगळुरू, गुवाहाटी, दिल्ली येथील महिलांनी जास्त चर्चा केली. 


विविध आव्हाने स्वीकारण्यात मुंबईतील महिला आघाडीवर
nसर्वेक्षणानुसार, विविध प्रकारची आव्हाने स्वीकारण्यात बंगळुरू, हैदराबाद, मुंबई येथील महिला आघाडीवर आहेत. 
nक्रिएटिव्ह शोकेस याविषयी चेन्नई, कोलकाता, मुंबईतील महिलांनी जास्त चर्चा केली. तर मनात असणाऱ्या गोष्टी सोशल मीडियावर सांगण्यात मदुराई आणि मुंबई येथील महिला आघाडीवर आहेत. दररोजच्या घडामोडीविषयी चेन्नई आणि मुंबई येथील महिलांनी सर्वांत जास्त चर्चा केली.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Women, girls talking on what topics; twitter report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.