Join us
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू; तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 06:41 IST

कुर्ला येथील दुर्घटना

मुंबई :  कुर्ला येथे मोडकळीस आलेल्या शौचालयाची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. तर तिघे जखमी झाले. द्रौपदी परशुराम रावले (५५) असे मृत महिलेचे नाव आहे. कुर्ला येथील नौपाडा बॉम्बे उत्कल समिती परिसरात ही घटना घडली. येथील शौचालये मोडकळीस आल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. पर्यायी व्यवस्था नसल्याने महिला याच शौचालयांचा वापर करत होत्या.

सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास नैसर्गिक विधीस आलेल्यांच्या अंगावर भिंत काेसळून चाैघे अडकले. स्थानिकांनी तिघांना बाहेर काढले.  अग्निशमन  दलाने दोन तासांच्या प्रयत्नानंतर रावले यांना बाहेर काढलेे.  उपचारादरम्यान त्यांचा राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला. 

 

टॅग्स :मुंबईमृत्यूअपघात