वर्षभर हवा चांगली राहील का? नव्या वर्षात गुणवत्तेचा दर्जा ‘मध्यम’; वेबसाइट सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:51 IST2025-01-03T14:51:18+5:302025-01-03T14:51:42+5:30
मुंबईची अवस्था दिल्लीसारखी किंवा दिल्लीपेक्षा वाईट होऊ द्यायची नसेल तर महापालिकेसह सर्वच प्राधिकरणांनी वायुप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले.

वर्षभर हवा चांगली राहील का? नव्या वर्षात गुणवत्तेचा दर्जा ‘मध्यम’; वेबसाइट सुरू
मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सांगणारी यंत्रणाच ढेपाळल्याने पर्यावरण अभ्यासकांनी महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही प्राधिकरणाची यंत्रणा सुरू झाली. मुंबईत नव्या वर्षाच्या सुरुवातीला हवेच्या गुणवत्तेचा दर्जा मध्यम नोंदविण्यात आला आहे.
मुंबईची अवस्था दिल्लीसारखी किंवा दिल्लीपेक्षा वाईट होऊ द्यायची नसेल तर महापालिकेसह सर्वच प्राधिकरणांनी वायुप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले.
वायुप्रदूषणाची तक्रार करण्यासाठी ॲप असले तरी तक्रारीची दखल घेणे गरजेचे आहे. नुसत्या तक्रारी केल्या जात असतील आणि त्या सुटत नसतील तर स्वच्छ हवा हे स्वप्नच राहील. सर्व यंत्रणांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तर वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहील.
- सुमेरा अब्दुलअली, संस्थापक, आवाज फाउंडेशन
परिसर निर्देशांक दर्जा
बीकेसी १३५ मध्यम
बोरीवली पूर्व ११५ मध्यम
भायखळा १३४ मध्यम
चेंबूर ११८ मध्यम
टी २ विमानतळ १२९ मध्यम
कुलाबा ७९ समाधानकारक
देवनार ११४ मध्यम
घाटकोपर १६० मध्यम
कांदिवली पूर्व १०९ मध्यम
वांद्रे पूर्व ९९ समाधानकारक
भांडूप प. ९८ समाधानकारक
कुर्ला १०३ मध्यम
मालाड प. १०० समाधानकारक
माझगाव १३१ मध्यम
मुलुंड प. १०१ मध्यम
पवई ११६ मध्यम
शिवडी १०२ मध्यम
वरळी १२५ मध्यम
सायन १४५ मध्यम
पंकजा मुंडे यांनी बोलावली बैठक
- मुंबई शहर व परिसरातील वाढत्या प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक बोलावली आहे.
- महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य, सचिव यांच्या उपस्थितीत
६ जानेवारीला मंत्रालयात ही बैठक होणार आहे.
- प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.