Join us  

सोनू सदूच्या अडचणी वाढणार? धाडीत 250 कोटींच्या व्यवहाराची अनियमितता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 12:44 PM

सोनू सूदच्या आर्थिक व्यवहारात 250 कोटी रुपयांची अनियमितता असल्याचा आरोप आहे. त्यामध्ये, चॅरिटीसाठी मिळालेले फंड आणि बोगस काँट्रॅक्ट यांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देसोनू सूदने क्राऊडफंडींगच्या माध्यमातून 20 कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. तर 65 कोटी रुपयांचे नकली काँट्रॅक्टच्या माध्यमातून जमा केले असून 175 कोटी रुपयांचे सर्क्युलर आणि संशयास्पद ट्रान्झेक्शन आहे.

मुंबई - कोरोना महामारीच्या काळात हजारो स्थलांतरित मजुरांना मदत करणारा चित्रपट अभिनेता सोनू सूद याने २० कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप प्राप्तिकर खात्याने केला आहे. सोनू सूद याच्या निवासस्थानासह मुंबई, लखनौ आणि दिल्लीतील कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याने छापे मारले होते. त्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. आता, सोनू सूदच्या संपत्तीत 250 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सोनू सूदच्या आर्थिक व्यवहारात 250 कोटी रुपयांची अनियमितता असल्याचा आरोप आहे. त्यामध्ये, चॅरिटीसाठी मिळालेले फंड आणि बोगस काँट्रॅक्ट यांचाही समावेश आहे. सोनूने ही देगणी संपूर्ण भारतात दिली आहे. सध्या, सातत्याने सोनू सूदच्या मालमत्तेवर छापेमारी करण्यात येत आहे. इन्कम टॅक्स विभागाने आत्तापर्यंत 28 जागांवर धाड टाकली आहे. त्यामध्ये, मुंबई, दिल्ली, लखनौ, कानपूर आणि गुरुग्राम यांचाही सहभाग आहे. सोनू सूदविरुद्ध करण्यात आलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी चौकशी आहे. 

सोनू सूदने क्राऊडफंडींगच्या माध्यमातून 20 कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. तर 65 कोटी रुपयांचे नकली काँट्रॅक्टच्या माध्यमातून जमा केले असून 175 कोटी रुपयांचे सर्क्युलर आणि संशयास्पद ट्रान्झेक्शन आहे. आयटी विभागाने सोनूकडून कॅशही जमा केली आहे.   केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सोनू सूद याच्या लखनौ येथील औद्योगिक क्लस्टरमधील कार्यालयांवर छापे मारले होते. हा समूह पायाभूत विकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. मुंबई, दिल्ली, लखनौ, कानपूरसह एकूण २८ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती. याबाबत सीबीडीटीने माहिती दिली आहे. छाप्यांमध्ये अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यातून करचुकवेगिरी उघड झाल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

शिवसेनेची भाजपावर टीका 

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर शिवसेना आणि आम आदमी पार्टीने भाजपवर टीका केली होती. सोनू सूद याच्यासारख्यांवर अशा प्रकारचे छापे मारणे म्हणजे कोत्या मनाचे लक्षण असल्याचे शिवसनेने म्हटले होते. सोनू सूद याला ‘आप’ने त्याला दिल्ली सरकारच्या विद्यार्थी मार्गदर्शक कार्यक्रमाचा ब्रॅंड ॲम्बेसेडर बनविले होते.

एफसीआरए कायद्याचे उल्लंघनही केले

सोनू सूदने बेहिशेबी पैसा बनावट संस्थांच्या माध्यमातून बोगस कर्जाद्वारे पैसे वळविल्याचे आढळले आहे. तसेच एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केल्याचाही आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याने क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून परदेशी देणगीदारांकडून २.१ कोटी रुपये गोळा केल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.  

टॅग्स :सोनू सूदमुख्य आयकर आयुक्त कार्यालयधाडमुंबई