पाच वर्षांत प्रदूषण अधिकाधिक कमी करणार!, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 04:40 AM2019-12-04T04:40:58+5:302019-12-04T04:45:01+5:30

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी २ डिसेंबर, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाचे औचित्य साधत ‘येत्या ५ वर्षांत अधिकाधिक प्रदूषण कमी करण्याचा आम्हाचा संकल्प आहे...’ असे स्पष्ट केले.

Will reduce pollution more and more in five years! | पाच वर्षांत प्रदूषण अधिकाधिक कमी करणार!, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा संकल्प

पाच वर्षांत प्रदूषण अधिकाधिक कमी करणार!, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा संकल्प

Next

मुंबई : नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईसह देशभरातील शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. येथील प्रदूषण कमी करण्यासाठी तेथील महापालिका आणि राज्य सरकार प्रयत्नशील असून, कृती आराखडाही राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या व्यतिरिक्त सामाजिक सेवाभावी संस्थांच्या मदतीने विविध उपक्रमही राबविले जात असतानाच, आता येत्या पाच वर्षांत अधिकाधिक प्रदूषण कमी करण्याचा संकल्प केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केला आहे.
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी २ डिसेंबर, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाचे औचित्य साधत ‘येत्या ५ वर्षांत अधिकाधिक प्रदूषण कमी करण्याचा आम्हाचा संकल्प आहे...’ असे स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांपासून दिल्लीने प्रदूषणाची धोक्याची पातळी ओलांडली असून, मुंबईसह मोठी शहरेही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. विशेषत: दिल्ली येथील प्रदूषण कमी करण्यासाठी ‘सम-विषम’सह उर्वरित अनेक प्रयोग राबविले जात असले, तरी प्रत्यक्षात प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारला म्हणावे तसे यश आलेले नाही.
मुंबईतदेखील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध कृतिशील उपक्रम राबविण्यावर सरकारसह सामाजिक सेवाभावी संस्थांकडून काम केले जात आहे. मात्र, प्रदूषणाचा आलेख चढताच आहे.
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरासह लगतच्या परिसरातील प्रदूषण विशेषत: वायुप्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेच्या मदतीने तयार केलेला ‘मुंबईचा स्वच्छ हवा कृती आराखडा’ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती-आराखड्यानुसार, २०२४ पर्यंत भारतातील प्रदूषण नियंत्रण रेषा ओलांडलेल्या १०२ शहरांमधील प्रदूषणकारक घटकांचा विसर्ग २०-३० टक्क्यांनी कमी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी काय करावे लागेल?
- कारखाने आणि विद्युत प्रकल्पांवर नियमितपणे देखरेख ठेवावी लागेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्वरित कारवाई करावी लागेल.
- सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये शुद्ध इंधनाचा वापर केलेल्या बस, विशेषत: इलेक्ट्रिक (विद्युत) बसची वाढ होईल, यावर जोर द्यावा लागेल.
- शहरात पदपथ आणि सायकलसाठी आवश्यक आणि योग्य मूलभूत सुविधा सुधारित आणि वृद्धिंगत कराव्या लागतील.
- इमारत बांधकाम करणे, पाडणे आणि कचरा हाताळणे यांच्यासंबंधी केलेल्या नियमांचे पालन सक्तीचे करावे लागेल. घातक प्रकल्प थांबवावे लागतील.
- कार्बन उत्सर्जन कमी करावे लागेल.
- जीवनशैली बदलत विकासाकडे वाटचाल करताना पर्यावरण दृष्टिकोन ठेवावा - जगण्याचे मॉड्यूल बदलावे लागेल.
- पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, असा विकास करण्यावर भर द्यायला हवा.

पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान धोक्याच्या पातळीवर
कार्बन उत्सर्जनामुळे सूर्याची उष्णता शोषली जाऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान, यंत्र येण्याच्या काळाच्या तुलनेत सुमारे १.५ अंश या धोक्याच्या पातळीवर गेले आहे.
वाढलेल्या वाहनसंख्येमुळे नागरिकांना वाहतूककोंडी, ध्वनी-वायुप्रदूषण, आरोग्यावरील दुष्परिणाम, मानसिक तणाव इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले.

Web Title: Will reduce pollution more and more in five years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.