Join us  

Ramdas Athawale: राज्याला GST चा परतावा आणि आर्थिक मदत मिळवून देणार- रामदास आठवले  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 6:03 PM

केंद्र सरकारकडे राज्य सरकारला येणारा वस्तू व सेवा कराचा (GST) परतावा मिळवून देण्यासाठी आणि राज्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे.

केंद्र सरकारकडे राज्य सरकारला येणारा वस्तू व सेवा कराचा (GST) परतावा मिळवून देण्यासाठी आणि राज्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे. ते मुंबईत एमएमआरडीएनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या चाचणीचं उदघाटन करण्यात आलं. तसेच यावेळी मुंबई विमानतळाजवळीन नव्या भुयारी मार्गाच्या भूमिपूजनाचाही कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आश्वासन दिलं. 

"एमएमआरडीएच्या परिसरात उद्धव ठाकरेंचा 'मातोश्री' आणि माझा 'संविधान' बंगला आहे. आम्ही जवळ राहणारे आहोत. आता जवळ नसलो तरी विकासासाठी आम्ही एकत्र यायला पाहिजे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि देशाच्या आर्थिक कारभारात मुंबईचं मोठं योगदान आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी बोललो आहे. केंद्राकडून राज्याचा जीएसटीचा परतावा येणं बाकी आहे तो टप्प्याटप्प्यात येईल. राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे", असं रामदास आठवले यावेळी म्हणाले.  

टॅग्स :रामदास आठवलेएमएमआरडीएउद्धव ठाकरेअजित पवार