सोने लाखाचा टप्पा गाठणार? कशामुळे वाढताहेत दर? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:01 IST2025-02-10T15:01:38+5:302025-02-10T15:01:58+5:30
सोन्याचा भाव वाढतच असून रविवारी प्रति तोळा ८७ हजार ७०० रुपये इतका दर होता.

सोने लाखाचा टप्पा गाठणार? कशामुळे वाढताहेत दर? जाणून घ्या...
सोन्याचा भाव वाढतच असून रविवारी प्रति तोळा ८७ हजार ७०० रुपये इतका दर होता. अशी माहिती सराफा व्यावसायिकांकडून देण्यात आली. २० जानेवारीपर्यंतच हाच भाव ८१ हजार रुपये होता. सोन्याची भाववाढ अशीच होत राहिल्यास कदाचित वर्षभरात तो एक लाख तोळापर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
सध्या भाववाढीमुळे आता सोन्याची जेमतेम खरेदी-विक्री सुरू आहे. केवळ लग्न, मुंज किंवा अन्य घरगुती कार्यक्रम असणारी मंडळीच सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे सोनसाखळी, अंगठी, मंगळसूत्राची खरेदी केली जात आहे. सोन्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार धीम्या गतीने सुरू आहेत, असे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचे भाव सध्या ८७ हजार ७०० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
- निर्भय सिंग, सुवर्ण विक्रेते
यामुळे दर वाढले
अमेरिकेत सत्ताबदलानंतर धोरणांमध्ये झालेले बदल, कॅनडामधील बँकेचे कमी झालेले व्याजदर, यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
२०२४-२५ मधील दर
नोव्हेंबर- ७५ हजार रुपये (प्रतितोळा)
डिसेंबर- ७८ हजार रुपये
जानेवारी- ८२ हजार रुपये
फेब्रुवारी- ८७,५०० रुपये
अशी झाली भाववाढ
वर्ष- दर (प्रतितोळा)
१९२५- १८.७५ रुपये
१९५०- ९९.१८ रुपये
१९७५- ५४० रुपये
२०००- ४,४०० रुपये
२०१०- १८,५०० रुपये
२०२०- ४९,००० रुपये