Vidhan Bhavan: विधानसभेत मत्स व बंदरेविकासमंत्री नितेश राणे हे कोकणावरील चर्चेला उत्तर देत होते. हे उत्तर देत असताना मुंबईतील वॉटर मेट्रोबाबत माहिती देताना त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांना प्रेमाने वॉटर मेट्रोतून एकत्र प्रवास करण्याचे निमंत्रण दिले.
नितेश राणे म्हणाले, “एमएमआर रिजनला वॉटर मेट्रोने जोडण्याचे काम केले जाणार आहे. जसे मेट्रो रेल्वेद्वारे आपण एकीकडून दुसरीकडे जातो, तसेच येणाऱ्या काळात आमचे वरुणजी (वरुण सरदेसाई) आदित्यजींना घेऊन नरीमन पॉइंटला लवकर पोहोचतील. तेही न पोहता, पेग्वीनला डिस्टर्ब न करता तुम्हाला मला सुखरूप नरीमन पॉइंटला आणायचे आहे.” त्यापुढे जाऊन राणे आदित्य ठाकरेंना म्हणाले, “आपण एकत्र वांद्रेवरून येऊ, मला तुम्ही जुहूला पिकअप करा, कारण मी जुहूला राहतो, तिथून आपण थेट नरीमन पॉइंटला येऊ, तुम्हाला कोल्ड कॉफी आवडते तीही तुम्हाला देऊ.”
आतापर्यंत ठाकरेंवर टीका करणारे आणि सभागृहातही त्यांच्याकडे रागाने बघून बोलणारे राणे एकदम बदलल्याचे पाहायला मिळाले. या अधिवेशनात असा प्रकार दोनदा घडल्याने राणे-ठाकरेंमधील कटुता कमी होतेय का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Web Summary : Nitesh Rane invited Aaditya Thackeray to travel via water metro and offered him cold coffee. Rane's softened tone sparked discussions about easing tensions between them, marking a possible shift after previous criticisms in the assembly.
Web Summary : नितेश राणे ने आदित्य ठाकरे को वॉटर मेट्रो से यात्रा करने और कोल्ड कॉफी का प्रस्ताव दिया। राणे के नरम लहजे ने उनके बीच तनाव कम होने की चर्चा छेड़ दी, जो विधानसभा में पिछली आलोचनाओं के बाद एक संभावित बदलाव है।