मेट्रो स्थानकांच्या नावांचे हक्क विकून करणार कमाई; एमएमएमओसीएलकडून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:00 IST2025-03-18T15:00:14+5:302025-03-18T15:00:27+5:30

एमएमआरडीएकडून मुंबई महानगरात ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभारले जात आहे. त्यासाठी एमएमआरडीएने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. मात्र, मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर केवळ तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून मेट्रोच्या संचलनाचा खर्च आणि कर्जाची परतफेड दोन्ही होणे शक्य नाही.

Will earn by selling the naming rights of metro stations; MMMOCL is trying to increase its income | मेट्रो स्थानकांच्या नावांचे हक्क विकून करणार कमाई; एमएमएमओसीएलकडून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न

मेट्रो स्थानकांच्या नावांचे हक्क विकून करणार कमाई; एमएमएमओसीएलकडून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न

मुंबई : तीन मेट्रो मार्गिकेवरील सहा स्थानकांच्या नावांच्या अधिकारांची विक्री करून आता महामुंबईमेट्रो संचलन मंडळ (एमएमएमओसीएल) उत्पन्न मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. यामध्ये निर्माणाधीन गुंदवली ते आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यानच्या मेट्रो ७ अ मार्गिकेवरील स्थानकांचाही समावेश आहे.

एमएमआरडीएकडून मुंबई महानगरात ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभारले जात आहे. त्यासाठी एमएमआरडीएने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. मात्र, मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर केवळ तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून मेट्रोच्या संचलनाचा खर्च आणि कर्जाची परतफेड दोन्ही होणे शक्य नाही. त्यामुळे एमएमआरडीएकडून तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य पर्यायांच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार स्थानकांच्या नावांचे अधिकार, जाहिरातींचे हक्क, मेट्रो मार्गिकांवर किरकोळ विक्री दालनांसाठी जागा भाड्याने देऊन उत्पन्नाचे मार्ग तयार केले जात आहेत.

या स्थानकांच्या नावांचे अधिकार विकणार
अंधेरी पश्चिम ते दहिसरदरम्यानच्या मेट्रो २ अ मार्गिकेवरील अंधेरी पश्चिम स्थानक, गुंदवली ते दहिसरदरम्यानच्या मेट्रो ७ मार्गिकेवरील मागाठणे, आकुर्ली आणि गुंदवली स्थानक, तसेच गुंदवली ते विमानतळाच्या मेट्रो ७ अ मार्गिकेवरील एअरपोर्ट कॉलनी या स्थानकांच्या नावांचे अधिकार विकले जाणार आहेत. 

दहा वर्षांसाठी दिले हक्क
मेट्रो स्थानकांच्या नावांचे अधिकार मिळविणाऱ्या कंपनीला त्यांचे नाव प्रदर्शित करण्यासाठी स्थानकांवर ५०० चौरस मीटरची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच मेट्रो स्थानकांवर जाहिरातींचे हक्कही दिले जाणार आहेत. मेट्रो गाडीतही या स्थानकांच्या नावांची उद्घोषणा करण्यात येणार आहे.
 

Web Title: Will earn by selling the naming rights of metro stations; MMMOCL is trying to increase its income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.