Join us

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:03 IST

आरोपी पतीचे नाव रॉय शेख (३४) असे असून, मृत पत्नीचे नाव रेखा खातून (२४) असे आहे.

मुंबई : पत्नीची हत्या केल्यानंतर फरार असलेल्या आरोपी पतीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आरोपी पतीचे नाव रॉय शेख (३४) असे असून, मृत पत्नीचे नाव रेखा खातून (२४) असे आहे.

रेखा ही काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालहून मुंबईत आली होती. रॉय शेख हा बांगड्या बनविण्याच्या वर्कशॉपमध्ये काम करतो. हे जोडपे गोरेगावमधील तिवारी चाळीत राहत होते. रॉयला रेखाच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून दोघांमध्ये वाद व्हायचे. रविवारी रॉयने रेखाच्या मैत्रिणीला फोन करून पत्नीची चौकशी करण्यास सांगितले. मैत्रीण रेखाच्या घरी पोहोचली, तेव्हा ती गंभीर जखमी अवस्थेत आढळली. 

तिला रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर रेखा हिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये दिसून आले. तिच्या नाकावर जखमा होत्या, तसेच तिचा पती रॉय गायब होता. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसपती- जोडीदार