मुंबई : पत्नी व मुले आपल्यावर करणी करत असल्याच्या संशयातून ५८ वर्षीय स्क्रॅप खरेदी-विक्रेत्याने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना धारावीत घडली. सूरजबेन अमृत सोलंकी (५२) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी अमृत याला अटक केली. हत्येनंतर मुलाला व्हिडीओ कॉल केल्यामुळे ही घटना उघडकीस आली.
जम्बा पास्कल चाळ, धारावी कोळीवाडा येथे ही घटना घडली. या दाम्पत्याला चार मुले असून, ती मुलुंड आणि ठाणे परिसरात कुटुंबासह राहतात. याप्रकरणी मुलगा शिवराम सोलंकी (३३) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून अमृत सोलंकी हे पत्नी व मुलांवर करणीचा संशय घ्यायचे.
१३ मार्चला नातेवाइकांच्या अंत्यविधीसाठी वडिलांना बोलवण्यासाठी शिवराम घरी गेला असता, दरवाजा बंद होता. प्रतिसाद न मिळाल्याने शिवरामने वडिलांना फोन केला. त्याचवेळी अमृत यांनी शिवराम यांना व्हिडीओ कॉल केला. कॉल उचलला असता, अमृत रक्ताने माखलेले दिसले. अमृतने पत्नीची ओढणीने गळा आवळून व पाण्याची बाटली डोक्यात घालून हत्या केल्याची कबुली दिली.
Web Summary : A 58-year-old Mumbai man, suspecting his wife of witchcraft, brutally murdered her in Dharavi. He confessed to strangling her and hitting her with a water bottle. The crime was revealed after he video-called his son covered in blood, leading to his arrest.
Web Summary : मुंबई के धारावी में एक 58 वर्षीय व्यक्ति ने जादू टोने के शक में अपनी पत्नी की बेरहमी से हत्या कर दी। उसने पत्नी का गला घोंटकर और पानी की बोतल से मारकर हत्या करने की बात कबूल की। खून से लथपथ बेटे को वीडियो कॉल करने के बाद अपराध का खुलासा हुआ, जिसके बाद उसे गिरफ्तार कर लिया गया।