मेट्रोसारखी यंत्रणा का नको?
By सचिन लुंगसे | Updated: September 4, 2025 10:55 IST2025-09-04T10:52:25+5:302025-09-04T10:55:13+5:30
मुंबई रेल प्रवासी संघाचे सिद्धेश देसाई यांनी सांगितले, मेट्रोसारख्या यंत्रणेत तिकीट तपासणीची गरज भासत नाही. त्यामुळे रेल्वेने तिकीट प्रणाली व प्रवेश-निर्गम पद्धतीतील त्रुटी दुरुस्त करण्याबाबत काम केले पाहिजे.

मेट्रोसारखी यंत्रणा का नको?
सचिन लुंगसे -
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही मागण्यांबाबत ठाेस भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात सुरक्षा यंत्रणांनीही सावध पवित्रा घेत परिस्थिती हाताळली; परंतु पाच दिवसांच्या काळात टर्मिनसवरील वातावरणाबाबत उपाययोजना करताना रेल्वे यंत्रणेला समतोल राखता आला नाही, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.
मुंबई रेल प्रवासी संघाचे सिद्धेश देसाई यांनी सांगितले, मेट्रोसारख्या यंत्रणेत तिकीट तपासणीची गरज भासत नाही. त्यामुळे रेल्वेने तिकीट प्रणाली व प्रवेश-निर्गम पद्धतीतील त्रुटी दुरुस्त करण्याबाबत काम केले पाहिजे.
अस्तित्वात असलेल्या रेल्वे तिकीट प्रणाली व प्रवेश-निर्गम पद्धतीमध्ये काही त्रुटी असल्यामुळे महसूल कमी होत आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही धोक्याची परिस्थिती निर्माण होत आहे.
खबरदारी घ्यावी
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले, आंदोलकांनीही संयम बाळगला पाहिजे. शिवाय मध्य रेल्वे किंवा उर्वरित कोणत्याही यंत्रणांना यासंदर्भात अगोदरच माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली पाहिजे.