कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात आला असला तरी अद्याप संकट टळले नाही. यासाठी मार्च २०२१ पर्यंत आणखी चारशे कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्याची विनंती प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली. मात्र आतापर्यंतच्या खर्चाचा हिशेब येईपर्यंत हा प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविण्याची उपसूचना भाजपने मांडली. परंतु, सत्ताधारी शिवसेनेने यावर मतदान घेत चारशे कोटी खर्चाला मंजुरी दिली. मतदानात शिवसेना विरुद्ध भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाची मते समान आल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत प्रस्ताव मंजूर केला. दरम्यान, यानंतर भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी पालिका प्रशासनावर ताशेरे ओढत सहा महिन्यांमध्ये मुंबई पालिकेनं खर्च केलेल्या १ हजार ६०० कोटी रूपयांचा हिशोब का दिला जात नाही, असा सवाल केला आहे. "मुंबई पालिकेचे कोरोनावर ६ महिन्यात १६०० कोटी रुपये खर्च. तर अजून ४०० कोटी हवे असे पालिका म्हणत आहे. पण झालेल्या खर्चाचा हिशोब का देत नाही? महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले? सँनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले? पर्यावरण प्रेमी वरळीला किती गेले?," असे सवाल आशिष शेलार यांनी केले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
पालिकेने खर्च केलेल्या १६०० कोटींचा हिशोब का दिला जात नाही?; शेलारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 13:34 IST
BMC : कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात आला असला तरी अद्याप संकट टळले नाही. यासाठी मार्च २०२१ पर्यंत आणखी चारशे कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्याची विनंती प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली.
पालिकेने खर्च केलेल्या १६०० कोटींचा हिशोब का दिला जात नाही?; शेलारांचा सवाल
ठळक मुद्देमार्च २०२१ पर्यंत करोना संकटाचा सामना करण्यासाठी आणखी चारशे कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्याची विनंती. यापूर्वीच्या १,६०० कोटींच्या खर्चाचा पालिकेकडून हिशोब का दिला जात नाही?, शेलारांचा सवाल