Join us  

Lockdown News: “चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र विलंब का करतोय?”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:05 PM

भाजपा आमदार आशिष शेलार यांची राज्य सरकारच्या धोरणांवर टीका

ठळक मुद्देमहाराष्ट्राची बाजू जागतिक औद्योगिक व्यासपीठावर मांडण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी कराराज्य सरकारने तातडीने या विषयात लक्ष घालावे भाजपा आमदार आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई - चीनसारख्या देशातून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र विलंब का करतोय? राज्याच्या अर्थकारण, रोजगार या दुष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाला केवळ एक कमिटी गठीत करुन शासकीय लाल फितीत का गुंडाळून ठेवताय? तातडीने निर्णय का घेत नाही? अशा प्रश्नांचा भडीमार भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर केला आहे.

याबाबत आशिष शेलार म्हणाले की, कोरोनामुळे जगातील औद्योगिक परिस्थिती विलक्षण बदलली असून संभाव्य मोठे बदल होणार हे लक्षात घेऊन गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक या सारख्या राज्यांनी तातडीने उद्योगांना रेड कार्पेट घालायला सुरुवात केली. कारण लॉकडाऊन आणि कोरोना याचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून प्रत्येक राज्यात त्यामुळे मोठी स्पर्धाच सुरु झाली आहे. केंद्र सरकारने या बदलत्या परिस्थिती नुसार तातडीने बदल आणि नवी धोरणे आखायला सुरुवात करताच उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांनी जुने कायदे बदलण्यात आघाडी घेतली. सध्याचे उद्योग टिकतील व नवे उद्योग आकर्षित होतील असे नवे धोरण व पोषक वातावरण तयार करण्यास सुरुवात केली असं त्यांनी सांगितले.

मग वास्तविक महाराष्ट्र हे औद्योगिक दुष्ट्या प्रगत राष्ट्र असून ओळखले जाते, अशावेळी महाराष्ट्र सर्वात आधी पुढाकार घेते. पण यावेळी महाराष्ट्राने याबाबत उशीर केला आहे. अन्य राज्यांनी रेड कार्पोरेट टाकल्यानंतर आपण आता कमिटी गठीत केली आहे. वास्तविक अन्य राज्यांची सुरू झालेली स्पर्धा पाहता यामध्ये झालेला कोणताही विलंब महाराष्ट्राचे मोठे नुकसान करणारा ठरणार आहे. त्यामुळे तातडीने अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून राज्य शासनाने या विषयात काम करणे आवश्यक आहे. याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान, राज्यातील उपलब्ध साधने, कायदे आणि बेरोजगार तरुणांची संख्या त्यांच्याकडे असणारे कौशल्य या सगळ्याचा सखोल विचार करुन नवे धोरण जाहीर करा, तसेच महाराष्ट्राची बाजू जागतिक औद्योगिक व्यासपीठावर मांडण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करा, अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोना संबधित रहस्यमय रोगाचा लहान मुलांना धोका; अमेरिकेसह अनेक देश चिंतेत!

मजुरांच्या मदतीला धावली ‘लालपरी’; आतापर्यंत ८ हजार जणांना पोहचवलं इच्छितस्थळी

आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!

पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?

येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट

टॅग्स :भाजपाउद्धव ठाकरेआशीष शेलारगुंतवणूकचीन