धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 16:32 IST2025-06-08T16:32:07+5:302025-06-08T16:32:33+5:30

महाराष्ट्राच्या ग्राहक आयोगाने मांसाहारी जेवणाशी संबंधित वादावर कठोर टिप्पणी केली. रेस्टॉरंटवर चुकीच्या पद्धतीने मांसाहारी जेवण दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

Why go to a non-vegetarian hotel if it hurts religious sentiments? Consumer Commission dismisses complaint in Mumbai on vegetarian people | धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

शाकाहारी व्यक्तीने मागविलेल्या जेवणामध्ये मांसाहारी जेवण आल्याने त्याने धार्मिक भावना दुखावल्याने ग्राहक आयोगाकडे धाव घेतली होती. परंतू, तिथे त्याला धार्मिक भावना दुखावत असतील तर मग ज्या हॉटेलमध्ये मांसाहारी देखील जेवण दिले जाते तिथून जेवण का मागविले, असा सवाल करत त्याची तक्रार फेटाळून लावली आहे. 

महाराष्ट्राच्या ग्राहक आयोगाने मांसाहारी जेवणाशी संबंधित वादावर कठोर टिप्पणी केली. रेस्टॉरंटवर चुकीच्या पद्धतीने मांसाहारी जेवण दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तक्रारदार शुद्ध शाकाहारी होते, मग मांसाहारी जेवण देणाऱ्या हॉटेलमधून त्यांनी कशासाठी जेवण मागविले, असा सवाल आयोगाने केला. त्यांनी शुद्ध शाकाहारी आणि फक्त शाकाहारी जेवण देणाऱ्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवायला हवे होते, असेही आयोगाने म्हटले आहे. तसेच एखादी विवेकी व्यक्ती जेवणापूर्वी शाकाहारी आणि मांसाहारी अन्नातील फरक समजू शकते, असेही आयोगाने म्हणत तक्रारदारांना फटकारले आहे.

मुंबईतील सायन भागातील हे प्रकरण आहे. १९ डिसेंबर २०२० रोजी वॉव मोमोस आउटलेटमधून सॉफ्ट ड्रिंकसह वाफवलेला 'दार्जिलिंग मोमो कॉम्बो' ऑर्डर केला होता. तेव्हा त्यांनी रेस्टॉरंटला व्हेज मोमोज हवेत असे सांगितले होते, तरीही त्यांना चिकन मोमोज देण्यात आले. आउटलेटवरील डिस्प्ले बोर्डवर जेवणात शाकाहारी की मांसाहारी पर्याय आहेत हे स्पष्टपणे नमूद केलेले नव्हते. या रेस्टॉरंटच्या निष्काळजीपणामुळे भावनिक त्रास झाला आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. यामुळे या दोघांनी सहा लाखांची भरपाई मागितली होती. 

तक्रारदारांनी स्वतः मांसाहारी पदार्थ मागवले होते, जे त्यांच्या बिलात देखील होते, असे रेस्टॉरंटने सांगत आरोप फेटाळले होते. उलट तक्रारदारांनी आमच्या कर्मचाऱ्यांचे शारीरिक शोषण केले, त्रास दिला असाही आरोप करण्यात आला होता. तसेच तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक ठरत नाहीत कारण त्यांना त्याऐवजी दुसरे व्हेज जेवण दिले गेले होते. याशिवाय त्यांना १,२०० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देखील देऊ केले होते. तरी देखील त्यांनी भरपाईची मागणी केली, हे सर्व त्यांना आम्हाला त्रास देण्यासाठी केले असा आरोप रेस्टॉरंटने केला. तसेच सर्व पुरावे समोर ठेवले.

यावर आयोगाने रेस्टॉरंटचे बिल पाहून तक्रारदारांनीच नॉनव्हेज पदार्थांची ऑर्डर केली होती. तसेच ऑफर बोर्डच्या फोटोमध्ये स्टीम्ड दार्जिलिंग मोमो कॉम्बो शाकाहारी आहे की मांसाहारी आहे हे स्पष्टपणे सांगितले नसले तरी, खाली शाकाहारी/मांसाहारी असे स्पष्ट लिहिले होते. याचबरोबर तक्रारदार ग्राहक त्यांच्या भावनांना ठेच पोहोचल्याचे पुरावे देण्यात अयशस्वी ठरले आहेत, असे सांगत आयोगाने ही तक्रार फेटाळून लावली. 


 

Web Title: Why go to a non-vegetarian hotel if it hurts religious sentiments? Consumer Commission dismisses complaint in Mumbai on vegetarian people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.