संबंध नसतानाही प्रतिक्रिया का देता?- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 04:41 AM2020-08-17T04:41:15+5:302020-08-17T07:03:44+5:30

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांचा या प्रकरणाशी संबंधच नाही तर राऊत का बोलत आहेत, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी रविवारी केला.

Why do you react even when there is no relationship? - Narayan Rane | संबंध नसतानाही प्रतिक्रिया का देता?- नारायण राणे

संबंध नसतानाही प्रतिक्रिया का देता?- नारायण राणे

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे शिवसेना नेते बोलत आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांचा या प्रकरणाशी संबंधच नाही तर राऊत का बोलत आहेत, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी रविवारी केला.
सुशांत आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना नेत्यांची विशेषत: संजय राऊत यांच्या विधानांमुळेच शंका उपस्थित होत असल्याचा दावाही राणे यांनी केला.
नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेवर निशाणा साधला. सुशांतसिंहप्रकरणी मुंबई पोलीस दबावाखाली तपास करत असून त्याची हत्याच झाल्याचा पुनरुच्चार राणे यांनी केला. मी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले नाही. मीडियानेच त्यांचे नाव घेतले आहे. सुशांतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाने त्यावर निर्णय घ्यावा. सीबीआय तपासातून सर्व सत्य समोर येईल. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर अपेक्षा वाढल्या आहेत, असे ते म्हणाले.

Web Title: Why do you react even when there is no relationship? - Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.