लहान मुलांची पाठ का दुखते? मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या अतिवापराचा होतोय परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 02:03 PM2023-09-12T14:03:09+5:302023-09-12T14:04:09+5:30

Mumbai: दप्तराचे ओझे जड झाल्यामुळे पाठ दुखायची. कोरोना काळात दप्तराचे ओझे कमी झाले. मात्र कोरोनाकाळात मोबाइल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली.

Why do children's backs hurt? Excessive use of mobile, laptop, computer is the result | लहान मुलांची पाठ का दुखते? मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या अतिवापराचा होतोय परिणाम

लहान मुलांची पाठ का दुखते? मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या अतिवापराचा होतोय परिणाम

googlenewsNext

मुंबई : दप्तराचे ओझे जड झाल्यामुळे पाठ दुखायची. कोरोना काळात दप्तराचे ओझे कमी झाले. मात्र कोरोनाकाळात मोबाइल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अनेकेवेळा मुले त्याच्यासमोर बसून अभ्यास करत बसायचे. ऑनलाइन शिक्षण बंद झाले तरी मुले विविध कारणांमुळे मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटरचा अतिवापर करत असल्याने लहान मुलांना पाठदुखी, मानदुखी व मणक्याच्या आजारांच्या सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी या सर्व गोष्टीचा वापर नियंत्रित केला पाहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

ही आहेत कारणे
मुलामध्ये पाठीच्या तक्रारी जाणवतात. त्यामध्ये अनेक तास चुकीच्या पद्धतीने बसने. दप्तराच्या ओझ्याचा पाठीवर ताण येत असतो. त्यामुळे पाठ दुखते. त्यासोबत लहान मुलांमध्ये काही जुनाट आजार असण्याची शक्यता असते. काहींना पाठीचा पोक स्केलोसिस नावाचा आजार असतो. 
- डॉ. मोहन देसाई, ऑर्थोपेडिक सर्जन, केइएम रुग्णालय

दप्तराचे ओझे : सर्व शाळा आता नियमितपणे सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे आले आहे. वाढत्या दप्तराच्या ओझ्याचा ताण पाठीवर येतो. तसेच काही विद्यार्थी एकाच खांद्यावर स्कूलबॅग अडकवतात. त्यामुळेही मानेवर ताण येऊन पाठदुखी सुरू होते. 

ऑनलाइन शिक्षण : कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षण संपले तरी मोबाइल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर काहींना काही कारणांमुळे शिक्षणाचे धडे सुरूच आहेत. ऑनलाइन प्रशिक्षिणासाठी बसण्याची पद्धत चुकीची असल्यामुळेही अनेकवेळा पाठीचे दुखणे सुरू होते. 

जुनाट आजार : आपल्याकडे टीबीचा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे पाठीचा टीबीदेखील नियमित पाहायला मिळतो. काही वेळ पाठीत गाठी असण्याच्या शक्यता असू शकते. यामुळेही पाठ दुखू होऊ शकते.   

काळजी काय घ्याल? 
नियमित व्यायाम : लहान मुलांनी व्यायाम म्हणजे प्रत्येक शाळेत त्यांचा शारीरिक शिक्षणाचा वर्ग असतो. त्यावेळी त्यांनी लहान सहन कवायती कराव्यात. तसेच मैदानी खेळ खेळावेत. 

मुलामध्ये पाठीच्या तक्रारी जाणवतात. त्यामध्ये अनेक तास चुकीच्या पद्धतीने बसने. दप्तराच्या ओझ्याचा पाठीवर ताण येत असतो. त्यामुळे पाठ दुखते. त्यासोबत लहान मुलांमध्ये काही जुनाट आजार असण्याची शक्यता असते. काहींना पाठीचा पोक स्केलोसिस नावाचा आजार असतो. 
- डॉ. मोहन देसाई, ऑर्थोपेडिक सर्जन, केइएम रुग्णालय

Web Title: Why do children's backs hurt? Excessive use of mobile, laptop, computer is the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.