रवींद्र फाटक, मिलिंद नार्वेकर सूरतमध्ये शिंदेंना का भेटले?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 09:02 AM2023-11-22T09:02:43+5:302023-11-22T09:04:32+5:30

आमदार अपात्रता सुनावणी : प्रभू म्हणाले... माहीत नाही

Why did Ravindra Phatak, Milind Narvekar meet Shinde in Surat? | रवींद्र फाटक, मिलिंद नार्वेकर सूरतमध्ये शिंदेंना का भेटले?

रवींद्र फाटक, मिलिंद नार्वेकर सूरतमध्ये शिंदेंना का भेटले?

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडलेल्या आमदार अपात्रतेवरील सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी महत्त्वाची ठरली. आमदार संपर्कात नव्हते, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक सूरतला एकनाथ शिंदेंना का भेटले, असा अडचणीत टाकणारा सवाल शिंदे गटाचे वकील महेश 
जेठमलानी यांनी केला. यावर हे दोघे सूरतला कशासाठी गेले, हे मला माहीत नाही. शिंदेंसह आमदार संपर्कात नसल्यानेच बैठकीसाठी व्हीप बजावला, असा दावा प्रभू यांच्याकडून करण्यात आला.  

सुनील प्रभूंना बसविले साक्षीदाराच्या पिंजऱ्यात

nसुनील प्रभू यांच्या साक्षीला सुरुवात झाली तेव्हा ते आपल्या वकिलांसोबत बसले होते. त्याचवेळी अडचणीत आलेल्या मुद्द्यांवर त्यांना वकिलांकडून मार्गदर्शन केले जात हाेते. त्याला महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. 
nसुनावणीसाठी त्यांना स्वतंत्र बसवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी साक्षीदाराचा पिंजरा आणला जाईल, असे नमूद केले. जेवणानंतर जेव्हा सुनावणी सुरू झाली, तेव्हा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात प्रभू यांना बसवून आमदार अपात्रतेवरील सुनावणी पुन्हा पुढे सुरू झाली.

ठाकरे गटाचे आक्षेप फेटाळले
nनियमित सुनावणीला मंगळवारपासून  सुरुवात झाली. शिंदे गटाकडून जेठमलानी यांच्यासह १४ वकिलांची फौज उभी करण्यात आली. 
nसुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. 
nजेठमलानी यांनी प्रभू यांना उलटसुलट प्रश्न करीत घेरण्याचा प्रयत्न केला. यावर ठाकरे गटाच्या वकिलांकडून आक्षेप आले. मात्र, अध्यक्षांनी परवानगी दिली नाही.

‘मी अडाणी नाही, पण मराठीत कॉन्फिडंट’
nसुनावणीत सुनील प्रभू मराठी भाषेसाठी आग्रही राहिले. यावर दाखल केलेली याचिका इंग्रजीत असल्याचा मुद्दा जेठमलानी यांनी उपस्थित केला.
nही याचिका व शपथपत्र दाखल करताना वकिलांकडून समजून घेतले का, या प्रश्नावर वकिलांना मराठीतून काय हवे ते सांगितले त्यानुसार त्यांनी ड्राफ्ट तयार करून पुन्हा मला समजावून सांगितला, असे प्रभू यांनी सांगितले. 
nपण इंग्रजी भाषेत असल्याने तुम्ही न वाचता सही केली, असे समजायचे का, असा सवाल जेठमलानी यांनी केला तेव्हा “मी अशिक्षित नाही. 
nअडीच लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करतो. मराठी भाषेत मी काॅन्फिडन्ट आहे. त्यामुळे  इंग्रजीतील प्रत्येक  शब्द ॲड. असिम सरोदे यांच्याकडून समजावून घेतला आणि 
मग सही केली”, असे प्रभू यांनी सांगितले.

Web Title: Why did Ravindra Phatak, Milind Narvekar meet Shinde in Surat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.