Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:22 IST

...त्यामुळे येथील लढत ही केवळ प्रभाग जिंकण्यापुरती मर्यादित न राहता ठाकरे बंधूंची ताकद आजमावणारी व महायुतीच्या संघटनात्मक बळाची कसोटी घेणारी ठरणार आहे.

महेश पवार -

मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे हे प्रतिनिधित्व करत असल्याने तो नेहमीच चर्चेत असतो. आताही पुन्हा तो केंद्रस्थानी आहे. पण, भाजप-शिंदेसेनेकडून बीडीडी चाळीचा पुनर्विकास केल्याचा मुद्दा प्रचारात उतरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील लढत ही केवळ प्रभाग जिंकण्यापुरती मर्यादित न राहता ठाकरे बंधूंची ताकद आजमावणारी व महायुतीच्या संघटनात्मक बळाची कसोटी घेणारी ठरणार आहे.

 सर्वात मोठा धोबीघाट, आर्थर रोड तुरुंग, महालक्ष्मी रेसकोर्स, बीडीडी व बीआयटी चाळी, वरळी कोळीवाडा, सी-फेस परिसरातील  टॉवर्स, उच्चभ्रू निवासी संकुले यांचा वरळी मतदारसंघात समावेश होतो. एकेकाळी येथे गिरणी कामगारांचे वर्चस्व होते. मात्र, गिरण्या बंद पडल्यानंतर त्या जागी टोलेजंग इमारती, पंचतारांकित हॉटेल्स, मल्टिप्लेक्स उभे राहिल्याने परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. वरळीतील समुद्रकिनारा परिसराचे सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे परिसर पर्यटकांनाही आकर्षित करत आहे.

विधानसभेत मिळालेली प्रभागनिहाय मते 

प्रभाग    मनसे    उद्धवसेना     शिंदेसेना १९३    ४,८४१    ८,३७५    ७,७१३१९५    २,६९९    ९,७११    ९,३६११९६    ३,०५६    १२,०९७    ८,५११ १९७    १३६७    १०,१२९    ६,३४२१९८    ४,३४७    १२,४३०    ९,९८४१९९    १,३२६    ६,०९२     ७,०३२

२०१७ पालिका निवडणुकीतील विजयी उमेदवार हेमांगी वरळीकर (शिवसेना)१३,६७१ (मते) 

संतोष खरात  (शिवसेना)१०,८११ (मते) 

आशिष चेंबूरकर (शिवसेना)११,३०६ (मते) 

दत्ता नरवणकर (मनसे)४,४१९ (मते) 

स्नेहल आंबेकर (शिवसेना)१३,५१८ (मते) 

किशोरी पेडणेकर (शिवसेना) ११,२२९ (मते) 

२०१४ आणि २०१७ मध्ये नेमके काय घडले होते?आ. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे मिलिंद देवरा व मनसेचे संदीप देशपांडे उतरले होते. मात्र, मतदारांनी आदित्य ठाकरेंच्या बाजूने कौल दिला. २०१७ च्यानिवडणुकीत येथील सहा पैकी पाच प्रभागांत शिवसेना व १ प्रभागात मनसे उमेदवार विजयी झाले होते. यातील किशोरी पेडणेकर व स्नेहल आंबेकर यांना उद्धवसेनेने महापौरपदी बसविले. पक्ष फुटीनंतर येथील शिवसेनेचे चार माजी नगरसेवक  ठाकरे यांच्यासोबत राहिले. तर मनसे व उद्धवसेनेच्या प्रत्येकी १ माजी नगरसेवकाने शिंदेसेनेत  प्रवेश केला. 

हे मुद्दे ठरणार महत्त्वाचे वरळीत बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा खूप मोठा वर्ग इथे आहे. मात्र, वरळी कोळीवाडा, किनारपट्टीलगतच्या प्रभागात कोस्टल रोडसह सागरी प्रकल्पांना मच्छीमारांचा विरोध, बीडीडी चाळींचे पुनर्वसन, वाहतूक कोंडी, इमारतींचे पुनर्वसन असे काही महत्त्वाचे प्रश्न मतदारसंघात आहेत. त्यामुळे   निवडणुकीत स्थानिक प्रश्न निर्णायक ठरणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Worli: Thackeray's emotional strength vs. Mahayuti's organizational power? Key issues in focus.

Web Summary : Worli witnesses a battle between Thackeray's legacy and Mahayuti's strength. BDD Chawl redevelopment and coastal road projects are crucial issues. 2017 saw Sena's dominance, but political shifts have altered the landscape. Local concerns will significantly influence the upcoming elections.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६शिवसेनामनसेभाजपा