पोलिसांकडूनच कुठे नियमांचे पालन, तर कुठे उल्लंघन; रस्ते सुरक्षा सप्ताहातून नागरिकांमध्ये जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 02:16 AM2021-01-29T02:16:55+5:302021-01-29T02:17:20+5:30

यात रोड अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ८० टक्के पुरुष, तर २० टक्के महिलांचा समावेश होता. तर जखमीमध्येही ७५ टक्के पुरुषांचा समावेश आहे. 

Where the police follow the rules, where the violation; Awareness among the citizens through Road Safety Week | पोलिसांकडूनच कुठे नियमांचे पालन, तर कुठे उल्लंघन; रस्ते सुरक्षा सप्ताहातून नागरिकांमध्ये जनजागृती

पोलिसांकडूनच कुठे नियमांचे पालन, तर कुठे उल्लंघन; रस्ते सुरक्षा सप्ताहातून नागरिकांमध्ये जनजागृती

googlenewsNext

मुंबई : वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी रस्ते सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. अशात नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांकड़ून काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसले. तर बहुतांश ठिकाणी पोलीस नियमांचे पालन करताना दिसून आले. 

राज्यात दरवर्षी सुमारे ३५ हजारांहून अधिक रस्ते अपघातांमध्ये १३ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू होतो. गेल्या वर्षी १ जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १७२ जणांचा रोड अपघातात मृत्यू झाला आहे. २०१९ च्या तुलनेत हा आकडा कमी आहे. तसेच मार्च आणि जून दरम्यान लॉकडाऊनच्या काळात रोड अपघातात मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र नंतर याचे प्रमाण पूर्वीसारखे होण्यास सुरुवात झाली.  २०१९ मध्ये ४४७ जणांना रोड अपघातात जीव गमवावा लागल्याचे वाहतूक पोलिसांच्या वार्षिक अहवालातून समोर आले आहे. तर भरधाव वाहनाच्या धडकेत तर ३ हजार नागरिक जखमी झाले आहेत. अशात, मुंबईत १ लाख नागरिकांमागे १० हजार वाहने २०११ ते २०१९ दरम्यान नोंद झाली. रोड अपघाताला भरधाव दुचाकीस्वार सर्वाधिक कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. यात ४७ टक्के पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. यात रोड अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ८० टक्के पुरुष, तर २० टक्के महिलांचा समावेश होता. तर जखमीमध्येही ७५ टक्के पुरुषांचा समावेश आहे. 

भरधाव दुचाकीच्या अपघातामुळे ५१ टक्के मृत्यू झाले आहेत. यात १५ ते २९ वयोगटातील तरुणाईचा समावेश होता. परिमंडळ ६ आणि ७ मध्ये सर्वाधिक अपघाताच्या घटना घडल्या आहे. अपघातादरम्यान डोक्याला हेल्मेट नसल्याने डोक्याला मार बसत असल्याने मृत्यूचा आकडा वाढत असल्याने पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी नियम पाळणे गरजेचे
दुचाकी चालवणाऱ्या प्रत्येकाला मोटारवाहन कायद्याअंतर्गत हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. मात्र शहर पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांकडून हा नियम पाळला जात नसल्याच्या तक्रारी सर्वसामान्य जनतेकडून येत आहेत. त्यामुळे आधी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी कायद्याचे काटेकोर पालन करणे गरजचे आहे. याबाबत शासनाने ऑर्डर काढून हेल्मेट घालणे बंधनकारक करावे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. - अनिल ढाकणे, परिवहन आयुक्त 

ट्विटरवरून जनजागृती
मुंबई पोलिसांकड़ून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी ट्विटर अकाउंटवरून जनजागृती करण्यात येत आहे. यात, सीटबेल्ट् लावणे, हेल्मेट घालण्याबरोबर सिग्नल पाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Web Title: Where the police follow the rules, where the violation; Awareness among the citizens through Road Safety Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.