Join us
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: मुख्यमंत्री असताना लोकांच्या घराला 'मशाल' लावली आणि 'उद्ध्वस्त' केलं; नारायण राणेंची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 15:30 IST

उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि 'मशाल' हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली.

मुंबई-

उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि 'मशाल' हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. शिवसेनेचं नवीन चिन्ह क्रांती घडवेल असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. यावर नारायण राणे यांनी आज प्रत्युत्तर दिलं. "क्रांती घडवायची होती तर तुम्ही मुख्यमंत्री असताना क्रांती का घडवली नाही. लोकांच्या घराला मशाल लावली. नावात उद्धव आहे. पण उद्ध्वस्त करायला मशाल लावू नये", असं नारायण राणे यांनी म्हटलं. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

उद्धव ठाकरे 'सामना'मधून काळापैसा 'व्हाइट' करतात; नारायण राणेंचा गंभीर आरोप

"तुम्हाला तर क्रांती घडवायची होती तर सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री असताना क्रांती घडवली नाही. लोकांचं घर उद्ध्वस्त करायला मशाल लावली. तुमच्या नावात उद्धव आहे, पण उद्ध्वस्त करायला मिशाल लावू नये. आता राज्यात एवढा उजेड पडला आहे की मशालची गरजच पडणार नाही. याआधीही धनुष्यबाण काही उजेड पाडू शकला नाही, मग मशाल काय उडेज पाडणार", अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे.

"वाकायला पण डॉक्टर लागतो मग काम काय करणार?"; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

"मशाल काळोखातून रस्ता काढायला लागते. मग यांना काय दिसत नाही काय? एवढा उजेड आहे तर कशाला मशालची गरज आहे. लोकांना घर, अन्नधान्य आणि पोटाचा प्रश्न हे खरे प्रश्न आहेत", असंही नारायण राणे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :नारायण राणे उद्धव ठाकरे