तस्करीसाठी बनवला व्हॉट्सॲप ग्रुप; तिघांना बेड्या, 'डीआरआय'कडून पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 06:42 AM2023-08-16T06:42:55+5:302023-08-16T06:43:08+5:30

भारतात प्रतिबंधित असलेल्या कीटकनाशकाच्या तस्करीमध्ये ही टोळी कार्यरत होती.

whatsapp group created for smuggling three arrested | तस्करीसाठी बनवला व्हॉट्सॲप ग्रुप; तिघांना बेड्या, 'डीआरआय'कडून पर्दाफाश

तस्करीसाठी बनवला व्हॉट्सॲप ग्रुप; तिघांना बेड्या, 'डीआरआय'कडून पर्दाफाश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चीनहून दुबई आणि दुबईतून मुंबईत प्रतिबंधित कीटकनाशकांची तस्करी करण्यासाठी त्या तिघांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला होता आणि त्याद्वारे आपल्या तस्करीची माहिती एकमेकांना देत तस्करीच्या मालावर लक्ष ठेवून होते. मात्र, त्यांना गुप्त वाटणाऱ्या या गोष्टीची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यांच्या तस्करीचा पर्दाफाश झाला अन् तिघांच्याही हातात बेड्या पडल्या आहेत. राजन भानुशाली, दिनेश भानुशाली आणि भाविक दंड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, भारतात प्रतिबंधित असलेल्या कीटकनाशकाच्या तस्करीमध्ये ही टोळी कार्यरत होती. मात्र, थेट चीनमधून जर भारतात ते हे सामान घेऊन आले असते तर तपास यंत्रणांना त्यांचा संशय आला असता, असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी ती कीटकनाशके चीनमधून पहिल्यांदा दुबई येथे पाठवली. दुबईतून त्यांनी तो माल मुंबईत आयात केला. मात्र, आपली तस्करी पकडली जाऊ नये, याकरिता त्यांनी आयात होणाऱ्या सामानाचे नाव व तपशील बदलले होते. यातही अशा सामानाचा तपशील त्यांनी दिला की ज्यावर जास्त सीमा शुल्क लागू नये; परंतु, त्यांच्याकडे प्रतिबंधित कीटकनाशके असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या सामानासाठी छापेमारी करत त्यांच्या तस्करीचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे, या तिघांपैकी एका जणाला यापूर्वीदेखील ई-सिगरेट, व्हिटॅमीन-सी पावडर आदींची तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक केली होती.


 

Web Title: whatsapp group created for smuggling three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.