मोठा पाऊस पडला, तर पालिका काय करणार? पाण्याचा निचरा होण्यासाठी सरासरी दहा तास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 15:23 IST2023-07-31T15:21:42+5:302023-07-31T15:23:09+5:30
पाणीपुरवठा, आरोग्य या नागरी सेवा-सुविधांसह रस्ते वाहतूक, उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने अथक प्रयत्न केले आहेत.

मोठा पाऊस पडला, तर पालिका काय करणार? पाण्याचा निचरा होण्यासाठी सरासरी दहा तास
मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात एकाच दिवसात २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याच्या आतापर्यंत चार वेळा घटना घडल्या. असे असतानाही मुंबई महानगर अखंडपणे धावले आहे. जुलै महिन्यात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद असतानाही महापालिकेची यंत्रणा अथकपणे कार्यरत राहिली. पाणीपुरवठा, आरोग्य या नागरी सेवा-सुविधांसह रस्ते वाहतूक, उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने अथक प्रयत्न केले आहेत.
९ जूनला २०२१ मध्ये २०० मिमी पावसाच्या प्रसंगी गांधी मार्केट परिसरात ३.५ फूट ते ४ फूट साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सरासरी १० तासांचा कालावधी लागला होता. मात्र, यंदा २१ जूनच्या पावसात १०४ मिमी पाऊस कोसळूनही अवघे ४ इंच पाणी जमा झाले आणि त्याचा तत्काळ निचरा झाला. हिंदमाता परिसरात २०२१ मध्ये सरासरी ३ फूट साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी किमान सहा तासांचा कालावधी लागत होता. यंदा २१ जुलै रोजी १०४ मिमी पाऊस कोसळूनही अवघे ४ इंच पाणी साचले. या पाण्याचा संपूर्ण निचरा होण्यासाठी अवघी ३० मिनिटे लागलीत.