'बॉम्बे ब्लड ग्रूप' म्हणजे काय? आणि तो १०,००० मुंबईकरांमागे फक्त एका व्यक्तीमध्येच का आढळतो? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:16 IST2025-06-06T18:13:59+5:302025-06-06T18:16:41+5:30

रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचं म्हटलं जातं. कारण रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदाता व्यक्ती अनेक प्रकरणांमध्ये देवमाणूस ठरतो.

What Is The Bombay Blood Group And Why Is It Found Only In 1 Out Of 10000 Mumbaikars | 'बॉम्बे ब्लड ग्रूप' म्हणजे काय? आणि तो १०,००० मुंबईकरांमागे फक्त एका व्यक्तीमध्येच का आढळतो? जाणून घ्या...

'बॉम्बे ब्लड ग्रूप' म्हणजे काय? आणि तो १०,००० मुंबईकरांमागे फक्त एका व्यक्तीमध्येच का आढळतो? जाणून घ्या...

मुंबई

रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचं म्हटलं जातं. कारण रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदाता व्यक्ती अनेक प्रकरणांमध्ये देवमाणूस ठरतो. पण गरजू व्यक्तीला जे रक्त दिलं जातंय ते योग्य आहे का हे निश्चित करण्यासाठी रक्तगटाचा आधार घेतला जातो. त्यानुसार ए, बी, एबी आणि ओ असे रक्तगट निश्चित आहेत. ज्यात पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह असे प्रकार आहे. याची कल्पना कदाचित तुम्हाला असेलच पण काही दुर्मिळ रक्तगट देखील आहेत. जे सहसा उपलब्ध होत नाहीत आणि अशा व्यक्तींना जेव्हा रक्ताची गरज भासते तेव्हा धावपळ होते. बरेच कष्ट घ्यावे लागतात. 

नुकतंच, भारतातील एका ३० वर्षीय महिलेचं मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी झालं, ज्या दरम्यान रुग्णाला रक्ताची गरज भासली होती. पण तिच्या अत्यंत दुर्मिळ रक्तगटामुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. रक्तगटाचं नाव होतं 'बॉम्बे रक्तगट'(hh) हा एक असामान्य रक्तगट असून तो पहिल्यांदा १९५२ मध्ये तेव्हाच्या 'बॉम्बे' म्हणजेच मुंबईत आढळला होता. म्हणूनच त्याला बॉम्बे ब्लडग्रूप असं नाव दिलं गेलं. भारतात १०,००० पैकी फक्त एका व्यक्तीमध्ये हा रक्तगट आढळतो.

बॉम्बे ब्लडग्रूप दुर्मिळ का?
बॉम्बे रक्तगट (hh) दुर्मिळ मानला जातो कारण त्यात लाल रक्तपेशींवर H अँटिजेनचा अभाव असतो. H अँटिजेन हा A आणि B अँटिजेनच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा घटक आहे. H अँटिजेनशिवाय शरीर A किंवा B अँटिजेन तयार करू शकत नाहीत. अगदी रक्तात जनुकांचं अस्तित्त्व असलं तरीही. परिणामी, या रक्तगटाच्या व्यक्तींना इतर कोणत्याही गटाचे रक्त मिळू शकत नाही, ज्यामध्ये ओ-निगेटिव्हचाही समावेश आहे, जो सामान्यतः सार्वत्रिक दाता मानला जातो. या दुर्मिळतेमुळे रक्तसंक्रमण आव्हानात्मक ठरतं. बॉम्बे रक्तगटाची ओळख पहिल्यांदा १९५२ मध्ये मुंबईत डॉ. वाय.एम. भेंडे यांनी केली होती.

बॉम्बे रक्तगटाचे लोक फक्त त्याच गटाच्या व्यक्तींकडूनच रक्त घेऊ शकतात. हा गट अत्यंत दुर्मिळ आहे, जागतिक लोकसंख्येच्या अंदाजे ०.०००४ टक्के लोकांमध्ये आढळतो. मुंबईत १०,००० पैकी एक, युरोपमध्ये दहा लाखांपैकी एक आणि जगभरात अंदाजे ४० लाख लोकांमागे एकामध्येच हा रक्तगट आढळतो.

गोल्डन ब्लड ग्रुपबद्दल माहित्येय का?
बॉम्बे ब्लडग्रूप प्रमाणेच गोल्डन ब्लड ग्रूप देखील एक अत्यंत दुर्मिळ ब्लडग्रूप आहे. Rh-null ब्लडग्रूप या वैज्ञानिक नावाने ओळखला जाणारा हा ब्लडग्रूप जगातील सुमारे ८ अब्ज लोकसंख्येमध्ये फक्त ४५ जणांमध्येच आढळला आहे. १९६१ मध्ये या ब्लडग्रूपचा पहिल्यांदा शोध लागला होता. ज्यात Rh अँटिजेन नसतात, त्यामुळे तो अत्यंत दुर्मिळ ठरतो. गोल्डन ब्लड असलेले व्यक्ती अमेरिका, कोलंबिया, ब्राझील आणि जपान सारख्या देशांमध्ये आढळले आहेत.

गोल्डन ब्लडग्रूपचे फक्त ४५ जणच!
२०१८ च्या एका संशोधन अहवालात असे आढळून आले की जगभरात फक्त ४५ लोकांमध्ये दुर्मिळ Rh-null किंवा गोल्डन ब्लड ग्रुप आहे. त्यापैकी फक्त नऊ जण रक्तदान करण्यास पात्र आहेत. महत्वाची बाब म्हणजे या ब्लडग्रूपचा व्यक्ती कोणत्या ग्रूपच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतो. कारण तो इतर सर्व ब्लडग्रूपशी सुसंगत आहे. पण जर या ब्लडग्रूपच्या व्यक्तीला रक्ताची गरज भासली तर जुळणारा रक्तदाना शोधणं अत्यंत कठीण काम आहे. त्याच्या दुर्मिळतेमुळे आणि सार्वत्रिक सुसंगततेमुळे, हा जगातील सर्वात महागडा ब्लडग्रूप मानला जातो.

Web Title: What Is The Bombay Blood Group And Why Is It Found Only In 1 Out Of 10000 Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.