Join us  

Maharashtra Assembly Election 2019 : 'जनतेसाठी आम्ही स्वयंपाक करू, फक्त 'त्या' धरणातलं पाणी नको'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 4:11 PM

पुन्हा सरकार आल्यानंतर 10 रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार खिल्ली उडवली होती.

सोलापूर/बार्शी - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बार्शी येथील सभेत बोलताना, शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनेच्या 10 रुपयात थाळी देण्याच्या जाहीरनाम्यातील वचनावरुन पवारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. उद्धव ठाकरेंनी त्याच मंचावरुन पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही वचननामा गरीबासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी जाहीर केला. त्यामध्ये 10 रुपयांत जेवण देण्याचा काम आम्ही करतोय, पण तेही यांना नको वाटतंय, असे म्हणत पवारांनी शरद पवारांवर बाण सोडले.

पुन्हा सरकार आल्यानंतर 10 रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार खिल्ली उडवली होती. 'शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे,की स्वयंपाक करायचा आहे, असा सवाल पवार यांनी शिवसेनेला केला आहे. बार्शी येथील प्रचारसभेत ते शनिवारी बोलत होते. त्यानंतर, आज बार्शी येथे दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा झाली. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पवारांवर टीका. जनतेसाठी आम्ही स्वयंपाक करू, पण आम्हाला त्या धरणातलं पाणी नको, असे म्हणत उद्धव यांनी अजित पवारांच्या वक्तव्याची आठवण करून दिली.   

ही निवडणुकीची सभा आहे करमणुकीची सभा नाही, त्यामुळे मी विरोधकांवर टीका करणे टाळतो, असे म्हणत पवारांवर टीका करण्याचं उद्धव यांनी टाळलं नाही. सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, असेही त्यांनी म्हटले. शिवसेनाप्रमुख असले असते तर असा मित्र नको असे म्हणाले असते. एकतर स्वतः काही चांगलं करायचं नाही आणि जे चांगलं करते त्याला करू द्यायचे नाही, पवारांची नीती आहे. दिलेला शब्द खरा करण्यासाठीच शिवसेनेचा वचननामा असल्याचंही त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसउद्धव ठाकरेअजित पवारशरद पवारशिवसेनाविधानसभा निवडणूक 2019