जव्हारमध्ये पाणीटंचाई

By Admin | Updated: June 6, 2015 23:14 IST2015-06-06T23:14:09+5:302015-06-06T23:14:09+5:30

११ हजार लोकसंख्या असलेल्या शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना तहान भागविण्यासाठी भटकावे लागत आहे.

Water shortage in Jawhar | जव्हारमध्ये पाणीटंचाई

जव्हारमध्ये पाणीटंचाई

जव्हार : ११ हजार लोकसंख्या असलेल्या शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना तहान भागविण्यासाठी भटकावे लागत आहे. मात्र यावर उपाय शोधण्यासाठी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
शहरात ठिकठिकाणी गळती सुरु आहे. अनेक ठिकाणी पाईप फुटले असून यामुळे रस्त्यावर चिखल साचले आहे. विशेष म्हणजे, काही भागात गढूळ पाणी येत असल्याने याच पाण्यावर नागरिकांना आपली तहान भागवावी लागत आहे.
टंचाई असताना प्रशासनाकडून कुठलीही व्यवस्था किंवा दुरुस्ती करण्याकडे लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काही नागरिक पहाटेपासून दुचाकी किंवा रिक्षा करुन मिळेल तिथून पाणी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅँकरने करा पाणीपुरवठा
मुंबई, ठाणे शहराला पाणी पुरवठ्याकरिता मोठ-मोठे धरण बांधण्यात आलेले आहेत. ते याच तालुक्यात आहेत. परंतु येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत असताना प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. किमान टँकरने पाणी पुरवठा करावा,अशी मागणी आहे.

केवळ १९ फूट पाणीसाठा
जयसागर धरणात केवळ १९ फुट पाणी साठा शिल्लक आहे. दररोज पाणी पुरवठा केल्यानंतर ४ फुट पाणी कमी होते. विशेष म्हणजे, १९६२ मध्ये बांधण्यात आलेल्या या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाण्याचा साठा कमी झाला आहे. मात्र गाळ उपासण्याकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पालीकेने तातडीने पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा, नागरिकांना दिला आहे.

Web Title: Water shortage in Jawhar