अंधेरी, विलेपार्ल्यामध्ये २२ मे रोजी पाणी नाही; जलवाहिनी बदलण्यासाठी शटडाउन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 09:55 IST2024-05-17T09:53:29+5:302024-05-17T09:55:36+5:30
या दुरुस्तीच्या १६ तासांदरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

अंधेरी, विलेपार्ल्यामध्ये २२ मे रोजी पाणी नाही; जलवाहिनी बदलण्यासाठी शटडाउन
मुंबई : पालिकेच्या के पूर्व विभागात अंधेरी पूर्व येथील बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रेसिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेसिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे जलवाहिनी आणि नवीन जलवाहिनी (पार्ले आउटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुन्या जलवाहिनी काढण्याचे काम २२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून २३ मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत होणार आहे. या दुरुस्तीच्या १६ तासांदरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दुरस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वेरावली जलाशय १, २, ३ ची पाण्याची पातळी सुधारेल व त्यामुळे अंधेरी पूर्व व पश्चिम, जोगेश्वरी पूर्व व पश्चिम, विलेपार्ले पूर्व व पश्चिम या भागांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कायमस्वरूपी सुधारणा होणार आहे. या काळात या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
... या भागांत निर्जळी
के पूर्व विभाग - त्रिपाठीनगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाउंड, कलेक्टर कॉलनी मातोश्री क्लब, दुर्गानगर, दुर्गानगर, सारीपूतनगर, दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलती पाडा, गणेश मंदिर परिसर जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता, बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचानगर, वांद्रे भूखंड, हरीनगर, शिवाजीनगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी, विशाल सभागृह, वर्मानगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमानगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळ डोंगरी, जिवा महाले मार्ग, साईवाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजीनगर, संभाजीनगर, हनुमाननगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्रीनगर, आंबेडकरनगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग, पंप हाउस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजरनगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ, जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर.
पी दक्षिण विभाग – बिंबिसारनगर, बांद्रेकरवाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल परिसर, राम मंदिर मार्ग, के पश्चिम विभाग – सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, आंब्रे गार्डन पंप,जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग ,देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (जेव्हीएलआर ते जोगेश्वरी बस आगार), चार बंगला, डी. एन. नगर, जुहू-वेसावे जोडरस्ता, विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई पार्क, लोहियानगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरूनगर, मोरागाव, जुहू गावठाण, यादवनगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीननगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग (भाग) , गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली.