मतटक्का वाढणार ? कौल कुणाच्या पारड्यात पडणार याची उत्कंठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 08:35 IST2026-01-15T08:35:37+5:302026-01-15T08:35:37+5:30
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी आज मतदान : सर्व यंत्रणा सज्ज

मतटक्का वाढणार ? कौल कुणाच्या पारड्यात पडणार याची उत्कंठा
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २२७प्रभागांसाठी आज, गुरुवारी मतदान होत आहे. यावेळी मतदारांच्या वाढलेल्या संख्येमुळे मतदानाचा टक्काही वाढणार का, याची सार्वत्रिक उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई पालिका प्रशासनाने केले आहे.
२०१७मध्ये झालेल्या निवडणुकीत ९१,८०,४९७ मतदारांपैकी ५५.५९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी एक कोटी तीन लाख मतदार मतदानासाठी पात्र आहेत. यंदा मतदानाचा टक्का वाढणार का आणि वाढलेल्या टक्क्याचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार, याची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्राला आहे. १५ जानेवारीला मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारीला मतमोजणी होईल. निवडणुकीच्या रिंगणात १,७०० तयारी पालिकेने पूर्ण केली आहे. मतदान उमेदवार आहेत. निवडणुकीची संपूर्ण केंद्रावर आवश्यक यंत्रणा सज्ज आहे. सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत. ८० हजार कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेसाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. ६४ हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
प्रत्येक भागात एक सखी केंद्र
प्रत्येक प्रभागात महिलेच्या हाती व्यवस्थापन असलेले किमान एक गुलाबी 'सखी मतदान केंद्र' असेल. अशा केंद्रांमध्ये पोलिसांसह सर्व निवडणूक कर्मचारी महिला असतील. सुरक्षिततेच्या दृष्टीने २२ हजार पोलिसांचा ताफा निवडणुकीसाठी सज्ज आहे.
मतदार संख्या
पुरुष ५५,१६,७०७
महिला ४८,२६,५०९
इतर १,०९९
एकूण १,०३,४४,३१५