Viral News: मुंबईचा रिक्षावाला महिन्याला कमावतो ८ लाख रुपये! आयडिया ऐकून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:40 IST2025-06-05T11:22:54+5:302025-06-05T11:40:53+5:30

मुंबईतील एक रिक्षावाला सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल रिक्षावाला महिन्याला तब्बल ५ ते ८ लाख रुपये कमावतो.

Viral News: Mumbai's rickshaw driver earns Rs 8 lakh per month! You will also appreciate the idea after hearing it | Viral News: मुंबईचा रिक्षावाला महिन्याला कमावतो ८ लाख रुपये! आयडिया ऐकून तुम्हीही कराल कौतुक

Viral News: मुंबईचा रिक्षावाला महिन्याला कमावतो ८ लाख रुपये! आयडिया ऐकून तुम्हीही कराल कौतुक

पैसे कमावण्यासाठी कोण कधी काय शक्कल लढवेल  सांगता येत नाही. मुंबईतील एक रिक्षावाला सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल रिक्षावाला महिन्याला तब्बल ५ ते ८ लाख रुपये कमावतो. त्याच्या कमाईच आकडा ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. कोणतीही मोठी पदवी नाही, ना कोणती नोकरी, केवळ एक शक्कल लढवून आणि मेहनत करून हा रिक्षावाला बक्कळ कमाई करत आहे. त्याची ही कल्पना ऐकून सगळेच त्याचं कौतुक करत आहेत. 

लेन्सकार्ट प्रॉडक्ट लीडर राहुल रुपानी यांनी त्यांच्या लिंक्डइनवर या माणसाची कहाणी शेअर केली, जी आता व्हायरल होत आहे. राहुल यांनी सांगितले की, हा माणूस काहीही न करता केवळ त्याच्या ऑटोच्या मदतीने दरमहा सहजपणे ५ ते ८ लाख रुपये कमावतो. जेव्हा या माणसाची कहाणी लोकांसमोर आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्याची ही कहाणी शेअर करताना राहुल म्हणाले की, इतके पैसे कमवण्यासाठी तो त्याची रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला पार्क करतो आणि दररोज किमान २० हजारांची कमाई करतो.

रिक्षावाला करतो तरी काय?

आता मुंबईचा हा व्हायरल रिक्षावाला काय करतो तरी काय असा प्रश्न सगळ्यांना नक्कीच पडला असेल. तर, हा माणूस व्हिसा ऑफिसच्या बाहेर उभा राहतो आणि आत जाणाऱ्या लोकांच्या बॅगा आपल्या रिक्षेमध्ये सांभाळून ठेवतो. यामध्ये व्हिसा ऑफिसमध्ये कामानिमित्ताने येणाऱ्या लोकांची महत्त्वाची कागदपत्रे आणि वस्तू असतात. त्या बदल्यात तो त्यांच्याकडून एक हजार रुपये घेतो. अशा प्रकारे तो दिवसाला किमान २०-३० ग्राहक मिळवतो. त्यांच्याकडून दररोज त्याला २०-३० हजार रुपये सहज कमवता येतात. अशाप्रकारे हा रिक्षावाला महिन्याला ५ ते ८ लाख रुपये कमावतो. 

या ऑटो ड्रायव्हरची ही कहाणी लोकांपर्यंत पोहोचताच व्हायरल झाली आहे. राहुल रुपानी यांच्या या पोस्टवर लोकांनी जोरदार कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, "या माणसाकडे कदाचित येथे पदवी नसेल, पण तो त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धी वापरून चांगले पैसे कमवत आहे." तर दुसऱ्याने लिहिले की, "इतक्या छोट्या कल्पनेनेही लाखो रुपये कमवता येतात... यावर विश्वास ठेवणे कठीण आहे." नेटकरी त्याचे भरभरून कौतुक करत आहेत.

Web Title: Viral News: Mumbai's rickshaw driver earns Rs 8 lakh per month! You will also appreciate the idea after hearing it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.