लोकांच्या समस्येचं निराकरण गावातच, चक्क राज्यमंत्रीच 'राहुटी' घेऊन येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 12:09 IST2020-01-28T12:08:32+5:302020-01-28T12:09:40+5:30
राज्यमंत्री बच्चू कडू हे आपल्या सेवाव्रत कामासाठी परिचीत आहेत.

लोकांच्या समस्येचं निराकरण गावातच, चक्क राज्यमंत्रीच 'राहुटी' घेऊन येणार
मुंबई - प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि राज्यमंत्रीबच्चू कडू आता राज्यमंत्र्याची राहुटी आपल्या गावात हा उपक्रम राबवत आहेत. 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या 15 दिवसांच्या कालावधीसाठी मतदारसंघात हा उपक्रम घेण्यात येत असून थेट मंत्रीमहोदयच लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावात, घरापर्यंत पोहोचणार आहे. यापूर्वी आमदार असतानाही कडू यांच्याकडून हा उपक्रम राबविण्यात येत होता. आता, मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतरही त्यांनी ही सेवा सुरुच ठेवली आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू हे आपल्या सेवाव्रत कामासाठी परिचीत आहेत. सर्वसामान्य, गरिब अन् दिव्यांग व्यक्तींसाठी हे प्रसंगी सनदी अधिकाऱ्यांच्या अंगावरही धावून जातात. त्यामुळे, प्रशासनात कडू यांचा वेगळाच दबदबा आहे. आमदार असताना कडू यांनी आपल्या मतदारसंघात ''आमदाराची राहुटी आपल्या गावात'' ही योजना राबवली होती. त्यांची हीच योजना आता राज्यमंत्र्याची राहुटी आपल्या गावात अशी बनली आहे.
राहुटी म्हणजे काय ?
"राहुटी" तसा हा शब्द जुनाच आहे परंतु काळानुरूप हा शब्द लोप पावला. ब्रिटीश काळात दळणवळणाचे साहित्य नसल्याने अधिकारी, कर्मचारी हे गावातील लोकांचे काम करायला गावात तंबु टाकुन मुक्काम करत असे. यालाच "राहुटी" असे म्हणतात.