विजय मल्ल्याच्या मुंबईतील किंगफिशर हाऊसची ५२ कोटींना विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 06:58 IST2021-08-15T06:57:57+5:302021-08-15T06:58:20+5:30
Vijay Mallya : हैदराबाद येथील एका बांधकाम व्यावसायिकाने या मालमत्तेची खरेदी केली आहे. विलेपार्ले येथे विमानतळाजवळ किंगफिशर हाऊस हे किंगफिशर एअरलाईन्सचे मुख्य कार्यालय आहे.

विजय मल्ल्याच्या मुंबईतील किंगफिशर हाऊसची ५२ कोटींना विक्री
मुंबई : भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याच्या किंगफिशर हाऊसची ५२.२५ कोटी रुपयांना विक्री झाली आहे. हैदराबाद येथील एका बांधकाम व्यावसायिकाने या मालमत्तेची खरेदी केली आहे. विलेपार्ले येथे विमानतळाजवळ किंगफिशर हाऊस हे किंगफिशर एअरलाईन्सचे मुख्य कार्यालय आहे. या मालमत्तेच्या विक्रीबाबत अनेक बंधने असल्याने बँकांना अनेक दिवस खरेदीदार मिळत नव्हता. २०१२ साली किंगफिशर एअरलाईन बंद करण्यात आली होती. २०१६ साली बँकांनी या इमारतीची किंमत १५० कोटी ठरवली होती. मात्र, इमारतीच्या विक्रीला यश येत नव्हते. आठ लिलाव असफल झाल्यानंतर अखेर नवव्या लिलावात किंगफिशर हाऊसची खरेदी झाली. ३० जुलै रोजी हा व्यवहार पार पडला असून, या खरेदीतून २.६१ कोटी मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.
किंगफिशर हाऊसची इमारत बेसमेंट, ग्राऊंड फ्लोअर आणि अप्पर ग्राऊंड फ्लोर अशी आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ १,५८६ चौरस फूट आहे तर इमारतीच्या प्लॉटचे क्षेत्रफळ २,४०२ चौरस मीटर आहे.