Video: Part of the house in Dharavi collapses; 8 people injured | Video : धारावीत राहत्या घराचा भाग कोसळला; ८ जण जखमी 
Video : धारावीत राहत्या घराचा भाग कोसळला; ८ जण जखमी 

ठळक मुद्दे आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास या घराचा बराच भाग कोसळून ८ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.  सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सायन रुग्णालयातून देण्यात आली आहे. 

मुंबई - धारावी शेषवाडी येथे राहत्या घराचा भाग कोसळला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. धारावीतील 60 फिट रोडवरील शेषेवाडी येथील न्यू बस्ती येथील राहत्या घरचा बराच भाग कोसळला. या दुर्घटनेत कुटुंबातील ८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सायन रुग्णालयातून देण्यात आली आहे. 

हे राहते घर तळ मजला अधिक दोन मजली होते असून आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास या घराचा बराच भाग कोसळून ८ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मोहम्मद रफिक (22), जहान आरा खान(40), मोहम्मद रिझवान शेख (15), मोहम्मद राहजीत (22), पप्पू यादव (22), नवल राय (24), रश्मी खान (5) आणि रुकीया बानू (१७) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 

 


Web Title: Video: Part of the house in Dharavi collapses; 8 people injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.