Join us

VIDEO : मुंबई काही मिनिटांत; 'ही' जाहिरात सरकारी, तरीही लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 09:28 IST

या व्हिडिओला हजारो नेटिझन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

मुंबई : शहरातील वाहतूक कोंडीत तासनतास अडकणं, हा मुंबईकरांच्या सवयीचाच भाग बनत चालला आहे. रस्त्यावरील खड्डे, बेशिस्त वाहतूक यामुळं शहरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचं अनेकदा निदर्शनास आलं आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ हा फक्त वाहतूक कोंडीत जात असल्याचं दिसते. 

या वाहतूक कोंडीच्या जिवनशैलीमुळे दैनंदिन ताण-तणाव याचा परिणाम आरोग्यावरही होताना दिसत आहे.  याच  वाहतूक  कोंडीला आळा घाल्यासाठी आणि  मुंबईच्या कानाकोपऱ्यात काही मिनिटांत पोहोण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए)  340  किलोमीटरची  मेट्रो लाईन बनवण्यात येणार आहे. एमएमआरडीएकडून यांदसर्भातील एक जाहिरात करण्यात आली असून सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

ही जाहिरात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केली आहे. या जाहिरातीत मुंबईकरांचा निम्मावेळ वाहतूक कोंडीत जात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. म्हणजेच, जो वेळ आपल्या कुटुंबियांसोबत घालवायचा असतो, तो सर्व वेळ वाहतुकीत जात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. याशिवाय, आराम करण्याचा आणि खेळण्याचा वेळ सुद्धा याच वाहतूक कोंडीत जात असल्याचंही सांगत एमएमआरडीएनं अवघ्या काही मिनिटांत मुंबईच्या सर्वभागात जाण्यासाठी 340 किलोमीटरची मेट्रो लाईन उभारण्याचं उद्दिष्ट असल्याचं म्हटलं आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन या जाहिरातीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो नेटिझन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.  

टॅग्स :एमएमआरडीएमुंबईदेवेंद्र फडणवीसमेट्रो