Join us

Video : मानखुर्द येथील मंडाला येथे झोपडपट्टीच्या बाजूला भंगारच्या सामानाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:09 IST

Massive Fire : आगीचं कारण अस्पष्ट असून शेजारीच डंपिंग ग्राऊंड आहे. 

मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील मंडाला येथे झोपडपट्टीच्या बाजूला भंगारच्या सामानाला मोठी आग आहे. घटनास्थळी अग्निशमनच्या दलाच्या १४ गाड्या पोहचल्या आहेत, आगीचं स्वरुप भीषण असल्याने आणखीही गाड्या रवाना झाल्या आहेत. मात्र, आगीचं कारण अस्पष्ट असून शेजारीच डंपिंग ग्राऊंड आहे. आगीचा भडका उडाल्याने आगीला भीषण स्वरूप आले आहे. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी नाही. तर कोणीही जखमी नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 

आज दुपारी १४:२८ वाजताच्या सुमारास, एकता नगर, मानखुर्द, मुंबई येथे मंडला परीसरामध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, २०-फायरवाहन, ९-वॉटर टँकर, १-रेस्क्यु वाहन, ३-रूग्णवाहीका दाखल झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही  आग लेवल-३ ची आहे. सदर घटनेमध्ये अद्याप कोणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती मुंबई आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मिळाली आहे. 

टॅग्स :आगअग्निशमन दलमुंबई