Video: Fire in Powai hotel; Fireman got injured | Video : पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा जवान झाला जखमी 
Video : पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा जवान झाला जखमी 

ठळक मुद्दे. देवेंद्र यांच्या मणक्याला दुखापत झाली झाली त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाले असल्याची माहिती मिळत आहेत. हाय पो मॉलमधील एका हॉटेलला सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान आग लागली होती.

मुंबई -  पवई येथील हिरानंदानी परिसरातील हाय पो मॉलमधील एका हॉटेलला सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान आग लागली होती. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आग विजवताना दुसऱ्या मजल्यावर धुरात गुदमरून आणि त्यात पडून अग्निशमन दलाचे जवान देवेंद्र कोरडकर हे जखमी झाले.

देवेंद्र हे विक्रोळी अग्निशमन केंद्राचे अग्निशमन कर्मचारी आहेत. त्यास हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहेत. ही आग विझलेली असली तरी नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस आणि अग्निशमन दल करत आहेत. देवेंद्र यांच्या मणक्याला दुखापत झाली झाली असून त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाले असल्याची माहिती मिळत आहेत. 


 


Web Title: Video: Fire in Powai hotel; Fireman got injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.