Join us

Video - घाटकोपरमध्ये पारेख रुग्णालया शेजारील इमारतीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 15:53 IST

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई - घाटकोपरमध्ये पारेख रुग्णालया शेजारी असलेल्या एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या रुग्णालयात काहीजण अडकले होते. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व रुग्णांना सुखरुपपणे बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पारेख रुग्णालया शेजारी असलेल्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे. आग लागल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पारेख रुग्णालयात दाखल असलेल्या 22 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

करी रोड येथील अविघ्न पार्क टॉवरच्या २२ व्या मजल्यावर गुरुवारी सकाळी आग लागली होती. आग लागलेल्या फ्लॅटमध्ये कोणीच नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेनंतर टॉवरमधील फ्लॅट रिकामे करण्यात आले. दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले. लालबाग येथील महादेव पालव मार्गाजवळ 60 मजल्यांचा अविघ्न पार्क टॉवर आहे. गेल्या वर्षी 22 ऑक्टोबरला 19 व्या मजल्यावर आग लागली होती. 19 व्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे  सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबईआग