छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरआग लागल्याची घटना घडली. विमानतळाच्या टर्मिनल १ च्या धावपट्टीजवळच ही आग लागली. धुराचे मोठे लोट बघून विमानतळावर प्रवाशी घाबरले होते. सगळीकडे धुराच पसरले होते. दरम्यान, अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले.
गुरुवारी (९ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता अचानक टर्मिनल १ बी च्या जवळून आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसू लागले. त्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली. प्रवेशद्वार बंद करण्यात आले आणि विमानतळावरील अग्निशामक यंत्रणेने युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू केले. मुंबई महापालिकेच्या अग्निशामक दलालाही बोलावण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. महापालिकेच्या अग्निशामक दलाने सांगितले की, सायंकाळी ६.३५ वाजता विमानतळावर आग लागल्याची माहिती मिळाली.
विमानतळ टर्मिनल १ बी, सांताक्रूझ पूर्व येथील तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर ही आग लागली होती. टर्मिनलच्या केबल ट्रे आणि स्विच बॉक्समध्ये आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून प्रवेश देण्याचे गेट बंद करण्यात आले होते. त्यानंतर उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.
Web Summary : A fire erupted near the runway at Mumbai's Terminal 1, causing panic among passengers due to thick smoke. Firefighters were called, and efforts to control the blaze began. The fire, reportedly caused by a short circuit, started in the terminal's cable tray and switch box. Entry gates were temporarily closed as a precaution.
Web Summary : मुंबई के टर्मिनल 1 पर रनवे के पास आग लगने से यात्रियों में दहशत फैल गई। धुएं के गुबार से अफरा-तफरी मच गई। दमकल कर्मियों को बुलाया गया और आग पर काबू पाने की कोशिशें शुरू हुईं। शॉर्ट सर्किट से लगी आग टर्मिनल के केबल ट्रे और स्विच बॉक्स में लगी। एहतियात के तौर पर प्रवेश द्वार अस्थायी रूप से बंद कर दिए गए।