Join us

Video - मालाडमध्ये इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी तरुणीने बाल्कनीतून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 14:41 IST

Malad Fire : आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न आहेत.

मुंबईतील मालाडमध्ये एका 21 मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जनकल्याण नगरमध्ये असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील जनकल्याण नगर परिसरातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. यावेळी जीव वाचवण्यासाठी एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेतल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आगीच्या ज्वाळा खिडकीतून बाहेर येताना दिसत आहेत. यामुळे परिसरात धुराचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबईआग