Video : 'नाद नाही राजेंचा करायचा'... चाहत्यांचं प्रेम पाहून उदयनराजेंना अश्रू अनावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 01:16 PM2019-02-07T13:16:16+5:302019-02-07T13:22:35+5:30

Video : छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आणि आपल्या कार्यकर्त्यांना जीव लावणारा नेता म्हणून उदयनराजे भोसले महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

Video: 'Do not want to be kings' ... Udayan Rajen tears away from love of fans! | Video : 'नाद नाही राजेंचा करायचा'... चाहत्यांचं प्रेम पाहून उदयनराजेंना अश्रू अनावर!

Video : 'नाद नाही राजेंचा करायचा'... चाहत्यांचं प्रेम पाहून उदयनराजेंना अश्रू अनावर!

Next

मुंबई - माझ्यामुळं समाज नाही, समाजामुळं मी हाय... या डायलॉगने सुरू झालेलं आपल्यावरील गाणं ऐकून उदयनराजे भावूक झाले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या कार्यकर्त्यांनी बनवलेला गाणं उदनयराजेंना ऐकून दाखवला. एका कार्यकर्त्याने आपल्या गाडीत हे गाणं वाजवलं, तेव्हा कार्यकर्ते अन् उदयनराजे दोघांनाही अश्रू अनावर झाले. आले रे.. आले रे... आले रे.. माझे राजे... आले उदयनराजे... असे या गाण्याचे बोल आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आणि आपल्या कार्यकर्त्यांना जीव लावणारा नेता म्हणून उदयनराजे भोसले महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. शिवप्रेमी संघटना, शिवप्रेमी मावळे आणि साताऱ्याचा युवक उदयनराजेंनाच आपलं दैवत मानते. तर, आपल्या कार्यकर्त्यांसाठी उदयनराजेंचीही काहीही करायची तयारी असते. मग, कधी भरसभेत आय लव्ह यू म्हणणं असेल, एखाद्या आजीचा मुका घेणं असेल किंवा मिरवणुकीसाठी डॉल्बी वाजवरणारच, असा घेतलेला पवित्रा असेल, उदयनराजेंचंही कार्यकर्त्यांवरील प्रेम नेहमी चर्चेचा विषय ठरतो. आता, पुन्हा एका कार्यकर्त्यांच्या प्रमाने उदयनराजे भारावल्याचं दिसून आलं आहे. 

उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ साताऱ्यातील कार्यकर्त्यांनी एक गाणं बनवलं आहे. त्यामध्ये, नाद नाही करायचा... आले रे आले रे.. आले रे.. आले रे... माझे राजे... आले उदयनराजे असे बोल आहेत. विशेष म्हणजे साताऱ्यात एका कार्यकर्त्याने उदयनराजेंना गाडीत बसवल्यानंतर हे गाणं वाजवून दाखवलं. त्यावेळी, उदयनराजेंनी नाद नाही करायचा... असं ऐकताच कपाळावर हात मारून घेतला. तर, गाण्यातील शेवटचे शब्द ऐकताना उदयराजेंना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाला. उदयराजेंच्या गाडीभोवती असणारे कार्यकर्तेही यावेळी भावूक झाले होते. तर, एका कार्यकर्त्यानेही चक्क रुमालाने आपले डोळे पुसले. उदयनराजेंवरील या गाण्याचे बोल असे आहेत.

राष्ट्रात एक ह्रदयाचा नेक, नाद नाही राजेंचा करायचा. 
साताऱ्याचा शेर मावळ्यांचा ढेर, दम नाही कोणाचा लढायचा
राज्याची शान गरिबाची मान, मोघ झाला बघा बघ्यांचा 
आले रे आले रे आले रे, आले रे माझे राजे.... आले उदयनराजे 

Web Title: Video: 'Do not want to be kings' ... Udayan Rajen tears away from love of fans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.