Video : 'ना उदास हो मेरे हमसफर', प्रणिती शिंदेंचा शायराना अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 17:57 IST2019-07-01T17:53:55+5:302019-07-01T17:57:03+5:30
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्याचं काम केलं आहे.

Video : 'ना उदास हो मेरे हमसफर', प्रणिती शिंदेंचा शायराना अंदाज
मुंबई - लोकसभा निवडणूक वेगळ्या पद्धतीनं राबवलं गेलं. जाती आणि धर्माची खेळी करुन ही निवडणूक राबवली गेल्याचं सांगत, विधानसभेसाठी तयारीला लागा असं आवाहन काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. ऐकमेकांच्या विरोधात आपण लढलो तर आपणच कमी होणार आहोत, झालं ते सोडा. आता, नव्याने लढाईला सुरुवात करूया. आपला लढा हा आरएसएस विरोधात आहे, जाती अन् पातीवरुन राजकारण करणाऱ्याविरुद्ध आपली लढाई आहे. डिव्हाईड अँड रुल विरोधात आपली लढाई असल्याचे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्याचं काम केलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, प्रणिती यांचा चक्क शायराना अंदाज पाहायला मिळाला.
यह सफर बहुत है कठीण मगर, ना उदास हो मेरे हमसफर
के है, अगले मोड पे मंझिल एक, नही रहनेवाली ये मुश्कीले,
मेरे बात पे यकीन कर, ना उदास हो मेरे हमसफर
या शायराना अंदाजात प्रणिती यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. लोकसभेतील पराभवाची कारणे आणि आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी या पार्श्वभूमीवर प्रणिती यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साह दिसून आला. शिंदेसाहेबांनी सोलापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांना जेवढी ताकद दिली, तेवढी कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही जिल्ह्यात दिलेली नाही. आपण एकत्र राहिलो तरच आपला लढाई लढू शकू. एकमेकांना मदत करुन, एकमेकांना सोबत घेऊन आपण पुन्हा जिंकूया, लोकशाही बळकट करुया असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.
व्हिडीओ -