VIDEO: बॉलीवूड अभिनेत्री संतापली! प्रचार रॅलीतील फटाक्यांमुळे घराला आग, कार्यकर्त्यांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 22:14 IST2026-01-06T22:13:45+5:302026-01-06T22:14:51+5:30
या व्हिडिओत अभिनेत्री डेजी शाह तिच्या इमारतीच्या खाली उभी आहे जिथे वरच्या मजल्यावरील एका घराला आग लागली आहे

VIDEO: बॉलीवूड अभिनेत्री संतापली! प्रचार रॅलीतील फटाक्यांमुळे घराला आग, कार्यकर्त्यांना सुनावलं
मुंबई - अभिनेता सलमान खानसोबत सिनेमात काम केलेल्या अभिनेत्री डेजी शाहने सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिच्या घराच्या बाजूला इमारतीत मोठी आग लागल्याचे दिसून येते. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात काही उत्साही कार्यकर्त्यांकडून उमेदवाराच्या स्वागतासाठी फटाके फोडले जातात. मात्र याच फटाक्यांमधून ही आग लागल्याचा आरोप अभिनेत्री डेजी शाहने केला आहे.
या व्हिडिओत अभिनेत्री डेजी शाह तिच्या इमारतीच्या खाली उभी आहे जिथे वरच्या मजल्यावरील एका घराला आग लागली आहे. याठिकाणी काही लोक आले होते. निवडणुकीचा प्रचार करत होते. रस्त्यात फटाके फोडत होते. त्यामुळे इमारतीतील एका घराला आग लागली आहे. हे मूर्ख लोक रस्त्यात फटके फोडतात. मात्र यामुळे कुठे आग लागेल हे त्यांना समजत नाही. ही माणसे प्रत्येक इमारतीत जाऊन प्रचार करत होते. मात्र आग लागल्यानंतर ते पळून गेले. ज्या घराला आग लागली त्याच्यात बाजूला माझं घर आहे असं तिने सांगितले. बांद्रा येथील हा प्रकार आहे.
हा व्हिडिओ अभिनेत्रीने पोस्ट केला. त्यावर तिने माझे कुठल्याही राजकीय पक्षाशी देणेघेणे नाही. परंतु जेव्हा तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत असाल तर तेव्हा प्लीज तुम्ही असं माणसं सोबत आणा, ज्यांना काही तरी कॉमन सेन्स आहे. सुदैवाने माझ्या इमारतीच्या कमिटीतील लोकांनी मला घरात जाण्यापासून रोखले. इमारतीजवळ अशारितीने फटाके फोडणे योग्य नाही. ही नैसर्गिक दुर्घटना नाही तर काही मुर्खांमुळे घडलेली घटना आहे असं अभिनेत्री डेजी शाहने तिच्या व्हिडिओत म्हटलं.
पाहा व्हिडिओ