Join us

Video: अभिनेता अक्षय कुमारच्या 'त्या' जाहिरातीवर शिवप्रेमींचा संताप; माफी मागा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 17:01 IST

या जाहिरातीमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात असून सरकारने निरमाच्या जाहिरातीवर लवकर बंदी आणावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने केलेल्या जाहिरातीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. निरमा पावडरच्या जाहिरातीमध्ये अक्षय कुमार आणि इतर कलाकारांना मावळ्याच्या वेशात दाखविण्यात आलं असून या जाहिरातीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याची संतप्त भावना शिवप्रेमींनी मांडली आहे. 

या जाहिरातीत दाखविण्यात आलं आहे की, अक्षय कुमार आणि इतर मावळे लढाई करुन पुन्हा आपल्या दरबारी परतलेले असतात. त्यावेळी त्यांचे औक्षण करणाऱ्या महाराणींनी युद्धामध्ये खराब झालेल्या मावळ्यांच्या कपड्यावरुन भाष्य करतात. त्यानंतर या मावळ्यांना स्वत:चे कपडे निरमा पावडरने धुताना दाखविण्यात आलं आहे. यावरुन सोशल मीडियात शिवप्रेमींना #ApologizeAkshay हा ट्रेंड सुरु केला असून अक्षयच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याचंही आवाहन केलं आहे. 

 

या जाहिरातीमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात असून सरकारने निरमाच्या जाहिरातीवर लवकर बंदी आणावी अशी मागणीही करण्यात आली आहे. लाखो मावळ्यांच्या रक्ताने हा महाराष्ट्र घडला आहे हे अक्षयकुमारला काय कळेल असं सांगत लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा परिणामास सामोरे जा अशी धमकीही देण्यात आली आहे. 

 

 

 

 

 

टॅग्स :अक्षय कुमारसोशल मीडियाछत्रपती शिवाजी महाराज